Daiane Tomazoni : ब्राझीलसाठी कायपण! संघाच्या प्रत्येक गोलनंतर ‘ही’ मॉडेल होणार ‘टॉपलेस’

पुढारी ऑनलाईन डेस्क : फिफा विश्वचषक स्पर्धेच्या (Fifa World Cup) साखळी सामन्यात ब्राझीलच्या (Brazil) संघाने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करून चाहत्यांची वाहवाह मिळवली आहे. विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असणारा ब्राझील पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याच्या मार्गावर असून या संघाचे चाहते खूप उत्सुक आहेत. ब्राझीलची मॉडेल डियाने टॉमझोनी (Daiane Tomazoni) देखील त्यापैकी एक आहे. आता ब्राझील संघाच्या प्रत्येक गोलवर ती स्वत:चा टॉपलेस फोटो शेअर करणार असल्याचे डियाने हिने जाहीर केले आहे.
ब्राझीलचा (Brazil) संघ साखळी फेरीतील दोन सामने जिंकून सध्या ‘ग्रुप जी’मध्ये अव्वल स्थानी आहे. दरम्यान, तिसरा साखळी सामना खेळण्यापूर्वीच या संघाने राऊंड ऑफ 16 मध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. नेमारची दुखापत हा ब्राझीलसाठी चिंतेचा विषय असला तरी या दिग्गज खेळाडू शिवायसुद्धा हा संघ जबरदस्त प्रदर्शन करत आहे. याचा आनंद चाहत्यांसह अनेक स्टार मंडळींनाही झाला आहे. डियाने टॉमझोनी (Daiane Tomazoni) ही मॉडेल त्यापैकी एक आहे. आपल्या आवडत्या संघाच्या विजयासाठी ती प्रार्थना करत आहे.
याचदरम्यान डियानेने (Daiane Tomazoni) ब्राझीलच्या प्रत्येक गोलवर स्वत:चा टॉपलेस फोटो शेअर करण्याचे आनंदाच्या भरात जाहीर केले आहे. ती तिचा टॉपलेस फोटो फॉलोअर्सच्या ग्रुपमध्येच शेअर करणार असून जो पूर्णपणे सुरक्षित आहे. 24 वर्षीय डियाने टॉमझोनी सोशल मीडियावर खूप सक्रिय आणि लोकप्रिय आहे. इंस्टाग्रामवर तिचे हजारो फॉलोअर्स आहेत. डियाने अनेकदा तिचे सुंदर आणि हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. तिने सांगितले की, मी स्वझर्लंडविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर ब्राझीलच्या चाहत्यांना टॉपलेस फोटोचे सरप्राईज दिले होते. मी माझ्या ब्राझील संघासाठी भाग्यवान सिद्ध होऊ शकते, असेही तिचे म्हणणे आहे.
View this post on Instagram
ग्रुप जी मधील ब्राझीलचा तिसरा सामना कॅमेरूनविरुद्ध (brazil vs cameroon) आहे. संघाचा स्टार खेळाडू नेमार अंतिम-16 फेरीचा सामना सुरू होईपर्यंत तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा आहे. ब्राझीलच्या संघाने पाचवेळा फिफा विश्वचषक जिंकला असून यावेळी हा संघ सहाव्यांदा चॅम्पियन बनण्याच्या इराद्याने उतरला आहे. ब्राझीलचा संघ स्टार खेळाडूंनी भरलेला आहे आणि हा संघ कोणत्याही एका खेळाडूवर अवलंबून नसल्याचे आतापर्यंतचे प्रदर्शनने पाहून सिद्ध झाले आहे.