Roger Binny : सुनेमुळे वाढली बीसीसीआय अध्यक्षांची डोकेदुखी! कारण….

Roger Binny : सुनेमुळे वाढली बीसीसीआय अध्यक्षांची डोकेदुखी! कारण….
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष रॉजर बिन्नी (Roger Binny) आता अडचणीत सापडले आहेत. BCCI चे एथिक्स ऑफिसर माजी न्यायमूर्ती विनीत सरन यांनी बिन्नी यांना हितसंबंधांच्या वादासंदर्भात नोटीस पाठवली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार या प्रकरणी बिन्नी यांना 20 डिसेंबरपर्यंत लेखी उत्तर सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, 1983 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग असलेल्या रॉजर बिन्नी यांच्याविरोधात संजीव गुप्ता यांनी नियम 39 (2) ब अंतर्गत बिन्नी (Roger Binny) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. नियम 38 (1) आणि 38 (2) अंतर्गत हितसंबंधाबाबतचा नियम (Conflict of Interest) भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या तक्रारीची दखल घेत बीसीसीआयचे एथिक्स ऑफिसर सरन ॲक़्शन मोडमध्ये आले असून त्यांनी बिन्नी यांना या प्रकरणी लेखी उत्तर 20 डिसेंबर पर्यंत देण्यास सांगितले आहे. तसेच त्यांच्या उत्तरासोबत प्रतिज्ञापत्र जोडाण्याची सूचना केली आहे

सौरभ गांगुलीची जागा घेत बिन्नी हे काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयचे 36 वे अध्यक्ष बनले आहेत. सध्या ते 67 वर्षांचे आहेत. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा 1983 साली जिंकलेल्या वर्ल्डकप संघात बिन्नी प्रमुख खेळाडू होते. ते हे भारताकडून खेळणारे पहिले अँग्लो-इंडियन क्रिकेटपटू आहेत. नंतर रॉजर यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नी यानेही भारताचे प्रतिनिधित्व केले. रॉजर बिन्नी 1979-87 दरम्यान भारतासाठी 27 कसोटी आणि 72 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले. 1979 साली पाकिस्तानविरुद्ध बंगळुरू कसोटीतून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मयंती लँगर (mayanti langer)  ही रॉजर बिन्नी यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नी याची पत्नी आहे. ती सध्या मोठ्या गॅपनंतर पुन्हा स्टार स्पोर्ट्सवर अँकर म्हणून सक्रीय झाली असून याच मुद्यावरून नवा वाद उफाळला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news