फुटबॉल मैदान झाले बॉक्सिंगचा अखाडा! खेळाडूंनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी तुडवले (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : football match clash in russia cup : फुटबॉल सामन्यात दोन संघांच्या खेळाडूंमध्ये नेहमीच इर्षा पहायला मिळते. मात्र रविवारी (27 नोव्हेंबर) रशियन कप स्पर्धेच्या सामन्यादरम्यान घडलेल्या लाजिरवाण्या घटनेने फुटबॉल जगतात खळबळ माजली आहे. ही संपूर्ण घटना क्रेस्टोव्स्की स्टेडियमवर झेनिट सेंट पीटर्सबर्ग आणि स्पार्टक मॉस्को यांच्यातील सामन्यादरम्यान घडली. या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी फुटबॉल खेळणे सोडून फ्रिस्टाईल कुस्ती आणि बॉक्सिंग खेळणे पसंत केले. त्यात दोन्ही संघांच्या व्यवस्थापनातील स्टाफनेही उडी घेत मैदान हाणामारीने गाजवले.
सामन्याची 90 मिनिटांची निर्धारीत वेळ पूर्ण झाल्यानंतर इंज्युरी टाईममध्ये संपूर्ण वाद सुरू झाला. स्पार्टक मॉस्को संघाला फ्री-किक मिळाली होती. त्याचवेळी त्यांचा फॉरवर्ड खेळाडू क्विन्सी प्रोम्स आणि जेनिट सेंट पीटर्सबर्ग संघाचा मिडफिल्डर विल्मर बॅरिओस यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर दोघातील वाढत गेला. त्याचे पर्यवसण हाणामारीत झाले. हे पाहून मैदानाबाहेर बसलेले दोन्ही संघांचे राखिव खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांनीही या वादात उडी घेतली. दोन्ही गटांकडून लाथा बुक्क्यांचा मारा सुरू झाला. कोण खाली पडले. तर कोण हाताची मुठ करून गुच्ची घालताना दिसला. यात मैदानी रेफरींचे मात्र हाल झाल्याचे दिसले. (football match clash in russia cup zenit st petersburg and spartak moscow)
Que loucura!
O pau quebrou em Zenit e Spartak pela Copa da Rússia hoje.
Seis jogadores expulsos, entre eles os brasileiros Malcom e Rodrigão. pic.twitter.com/ZhkMyY0x9N
— Fábio Aleixo (@fabiopaleixo) November 27, 2022
जेनिट सेंट पीटर्सबर्गच्या रॉड्रिगो प्राडोने रेफरीसमोर स्पार्टक मॉस्कोच्या खेळाडूंना लाथ मारताना दिसला. हे दृश्य पाहताच स्पार्टकचा बदली खेळाडू अलेक्झांडर सोबोलेव्ह आक्रमक झाला. तो ॲक़्शन मोड आला आणि त्याने बॉक्सिंग स्टाईलने प्रतिस्पर्धी खेळाडूला धु धु धुतले. याशिवाय उर्वरित खेळाडूंचीही अशीच अवस्था होती. रशियन ब्रॉडकास्टर मॅच टीव्हीचे या हाणामारीशी संबंधित फुटेज सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि आतापर्यंत लाखो लोकांनी ते पाहिले आहे. (football match clash in russia cup zenit st petersburg and spartak moscow)
रेफरींनी दाखवले ६ खेळाडूंना रेड कार्ड…
सामनाधिकारी व्लादिमीर मोस्कालेव्ह यांनी सुरुवातीला हा वाद शमवण्याचा अटोकाट प्रयत्न केला. परंतु, परिथिती नियंत्रणाबाहेर गेली आणि क्षणात फुटबॉल मैदान कुस्ती-आणि बॉक्सिंगचा आखाडा झाले. अखेर हाणामारी थांबल्यानंतर दोन्ही संघातील प्रत्येकी तीन-तीन खेळाडू अशा एकूण सहा जणांना रेफरींनी रेड कार्ड दाखवले. यजमान जेनिट सेंट पीटर्सबर्ग संघाच्या माल्कम, बॅरिओस आणि रॉड्रिगो तर, स्पार्टक मॉस्को संघाच्या अलेक्झांडर सोबोलेव्ह, शामर निकोल्सन आणि अलेक्झांडर सेलिखोव्ह यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागले. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या खेळाडूंना रेड कार्ड दाखवण्यात आले ते राखीव खेळाडू होते आणि घटनेच्या वेळी ते सामन्याचा सक्रिय भाग नव्हते.
या सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लागला. यजमान जेनिट सेंट पीटर्सबर्गने 4-2 ने विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला. रेड कार्ड मिळूनही दोन्ही संघांकडे पेनल्टी शूटआऊटसाठी पुरेसे खेळाडू होते. सामन्याचा निकाल भलेही पेनल्टी शूटआऊटमध्ये लागला असला तरी जो तमाशा फुटबॉल मैदानात पाहिला गेला तो खरोखरच निराशाजनक होता.