Match Cancelled : सामना रद्द होण्याचा विक्रम भारताच्या नावावर | पुढारी

Match Cancelled : सामना रद्द होण्याचा विक्रम भारताच्या नावावर

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि न्यूझीलंडमधील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला. (Match Cancelled)सामन्यातील फक्त १२.५ ओव्हर या सामन्यात खेळवण्यात आल्या. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताने १२.५ ओव्हरमध्ये १ विकेट गमावत ८९ धावा केल्या. हा सामना भारतीय संघाच्या एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील ४२ रद्द झालेला सामना ठरला. सर्वाधिक सामने रद्द होण्याचा विक्रम भारतीय संघाच्या नावावर आहे. सरासरीनुसार भारताचा प्रत्येक २५ वा सामना रद्द होतो. सामने रद्द होण्यामागे पाऊस हा सर्वांत मोठा फॅक्टर राहिला आहे. तर काही सामने पाऊस नसतानाही रद्द झाले आहेत.

सामना रद्द झाल्यास प्रेक्षकांना पैसे परत मिळतात?

जर एखादा सामना एकही चेंडू न टाकता रद्द झाला तर प्रेक्षकांना तिकीटाचे पैसे परत मिळतात. यासाठी एक अट असते. बोर्डाकडून वैध ठरवलेल्या प्लॅटफॉर्मवरून ते तिकीट खरेदी करायला हवे. सामन्यात एक चेंडू जरी टाकला गेला तर प्रेक्षकांना प्रेक्षकांना पैसे परत मिळत नाहीत. (Match Cancelled)

सर्वांत जास्त भारत-श्रीलंका एकदिवसीय सामने रद्द (Match Cancelled)

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे सर्वांत जास्त सामने श्रीलंकेविरूद्ध रद्द झाले आहेत. भारताने आजवर श्रीलंकेविरूद्ध १६२ सामने खेळले आहेत. यामधील ११ सामने अनिर्णयीत राहिले आहेत. अनिर्णयीत सामन्यांमध्ये २००२ मध्ये खेळवण्यात आलेल्या चॅम्पीयन्स ट्रॉफीमधील सामन्यांचाही समावेश आहे. फायनल सामन्याच्या एक दिवसपूर्वी श्रीलंका फलंदाजी करत असताना पाऊसाला सुरूवात झाली. यानंतर एकही चेंडू टाकण्यात आला नाही. (Match Cancelled)

प्रेक्षकांनी दगडफेक केल्याने सामना झाला होता रद्द

प्रत्येक सामना पावसामुळे रद्द होतो असे नाही. पाकिस्तान विरुद्ध १९८९ खेळवण्यात आलेला सामना प्रेक्षकांमुळे रद्द करण्यात आला होता. त्यावेळी पाकिस्तानच्या तीन विकेट्स लवकर गमावल्याने पाकच्या प्रेक्षकांनी दगडफेक करण्यास सुरूवात केली होती. याप्रमाणेच भारत आणि श्रीलंकेदरम्यान २००९ मध्ये दिल्लीत खेळवण्यात आलेला एकदिवसीय सामना खराब खेळपट्टी असल्याने रद्द करण्यात आला होता. या सामन्यात २३.३ ओव्हर खेळवण्यात आल्या. खेळपट्टीतून चेंडू जास्त उसळी मारत होता. त्यामुळे फलंदाज जखमी होण्याची शक्यता होती. (Match Cancelled)

हेही वाचलंत का?

Back to top button