

पुढारी ऑनलाईन डेस्क : FIFA WC Brothers Pairs : कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धा (qatar fifa world cup 2022) दिवसेंदिवस रंजक होत चालली आहे. या जागतिक स्पर्धेत 32 संघांसह एकूण 831 खेळाडू सहभागी झाले आहेत. यात खेळाडूंच्या यादीत भावांच्या चार जोड्यांचाही समावेश आहे. यातील दोन भाऊ तर दोन वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधित्व करताना दिसत आहेत. चला जाणून घेऊया भावांच्या त्या 4 जोड्या…
विल्यम्स बंधूंची जोडी कतारमधील फिफा विश्वचषक 2022 मध्ये दोन वेगवेगळ्या देशांसाठी खेळत आहे. मोठा भाऊ इनाकी विल्यम्स (Inaki Williams) घानाकडून खेळतो, तर धाकटा भाऊ निको विल्यम्स (nico williams) स्पेनकडून खेळतो. मोठा भाऊ इनाकीला 2016 पासून स्पेन संघात स्थान मिळाले नाही, त्यानंतर तो घानाला गेला आणि तिथल्या संघात सामील झाला. दोन्ही भावांचे आई-वडील घानाचे असून ते नंतर स्पेनमध्ये स्थलांतरित झाले. इनाकी-निकोचा या भावंडांचा जन्म स्पेनमध्ये झाला असून ते दोघेही अॅथलेटिक बिल्वायो क्लबसाठी खेळतात. (FIFA WC Brothers Pairs four brothers pairs playing in tournament)
2014 मध्ये जेरोम प्रिन्स आणि केविन प्रिन्स यांनी वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधित्व केल्याची पहिलीच वेळ होती. तेव्हा एक भाऊ जर्मनी तर दुसरा भाऊ घाना संघाकडून खेळला. आता 8 वर्षांनंतर पुन्हा दोन भाऊ वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधित्व करत आहेत.
आंद्रे आणि जॉर्डन आयू यांच्याबद्दल बोलायचे तर, हे दोघे भाऊ घाना संघासाठी एकत्र खेळत आहेत. आंद्रे आयू (andre ayew) घाना संघाचा कर्णधार आहे. 2018 मध्येही या दोन्ही भावांनी घाना संघाचे प्रतिनिधित्व केले होते. आंद्रे आणि जॉर्डन यांचे वडील आबेदी पेले हे माजी फुटबॉलपटू आहेत. त्यांना तीन वेळा आफ्रिकन प्लेयर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता आंद्रे-जॉर्डन आयू ही भावंडाची जोडी घानासाठी उत्तम फुटबॉल खेळताना दिसत आहेत.
लुकास हर्नांडेझ (Lucas Hernandez) आणि थिओ हर्नांडेझ (Theo Hernandez) ही फ्रेंच जोडी कतारमधील फिफा विश्वचषक स्पर्धेत चमकण्यासाठी उत्सुक आहे. या दोन भावांचे वडीलही उत्तम फुटबॉलपटू होते. ते अॅथलेटिक्स माद्रिद क्लबकडून खेळायचे. आता लुकास आणि थिओ हे दोन्ही भाऊ फ्रेंच संघाकडून फुटबॉलचे मैदान गाजवत आहेत.
हॅझार्ड ब्रदर्स (Eden Hazard and Thorgan Hazard)
बेल्जियम फुटबॉल संघातही दोन भावांची जोडी खेळत आहे. इडन हॅझार्ड (Eden Hazard) आणि थॉर्गन हॅझार्ड (Thorgan Hazard) या भावंडाच्या जोडीवर बेल्जियमला विश्वचषक जिंकून देण्याची जबाबदारी आहे. या दोन्ही खेळाडूंची अतिशय आक्रमक फुटबॉलपटू म्हणून ओळख आहे. त्यांनी अनेक वेळा बेल्जियम संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. इडन-थॉर्गन ही भावाची जोडी मैदानात असताना प्रतिस्पर्धी संघाला सावध राहावे लागते, असे मानले जाते. (FIFA WC Brothers Pairs four brothers pairs playing in tournament)