Neymar Injured : नेमारच्या दुखापतीने ब्राझीलची ‘पार्टी’ खराब!

Neymar Injured : नेमारच्या दुखापतीने ब्राझीलची ‘पार्टी’ खराब!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Neymar Injured : ब्राझीलने अपेक्षेप्रमाणे फिफा विश्वचषकात आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली आहे. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या ब्राझीलने जी गटातील पहिल्या सामन्यात सर्बियाचा 2-0 असा पराभव केला. संपूर्ण सामन्यात वर्चस्व गाजवणाऱ्या ब्राझीलने तीन गुणांची कमाई करत आपल्या गटात अव्वल स्थान गाठले. मात्र, या सामन्यात सुपरस्टार फुटबॉलपटू नेमारला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघाची चिंता वाढली आहे.

गुरुवारी रात्री उशीरा झालेल्या सामन्यात ब्राझीलने सुरुवातीपासूनच सर्बियावर वर्चस्व गाजवले. यादरम्यान संघाने अनेक शानदार चाली केल्या. पूर्वार्धात एकही गोल होऊ शकला नाही. यादरम्यान नेमारने आपल्या उत्कृष्ट ड्रिबल कौशल्याच्या जोरावर सर्बियन खेळाडूंना अनेकदा चकवले. मात्र, यामुळे त्याला अनेक सर्वाधिक नऊ वेळा फाउलही सामोरे जावे लागले. (Neymar Injured fifa world cup 2022 brazil beat serbia in opning match)

दरम्यान, सर्बियाचा सेंटर डिफेंडर निकोला मिलेंकोविचच्या टॅकलमुळे नेमारला गंभीर दुखापत झाली आणि सामना संपायला 10 मिनिटे शिल्लक असताना त्याला मैदानाबाहेर जावे लागले. घोट्याच्या दुखापतीमुळे नेमार खूप अवस्थ असल्याचे दिसले. त्याच्या दुखापतीमुळे ब्राझीलच्या फुटबॉल चाहत्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, ब्राझील संघाचे डॉक्टर रॉड्रिगो लास्मर म्हणाले की, 'नेमारच्या उजव्या घोट्याला दुखापत झाली आहे. मैदानातून बाहेर आल्यानंतर आम्ही लगेच त्याच्यावर उपचार सुरू केले. त्याच्या दुखापतीचे मूल्यांकन करण्यासाठी पुढील 24 ते 48 तास प्रतीक्षा करावी लागेल. सध्या तरी आम्ही कोणतेही MRI शेड्यूल केलेले नाही. अशा स्थितीत त्याची दुखापत कितपत गंभीर आहे, याविषयी काही सांगणे योग्य ठरणार नाही.' (Neymar Injured fifa world cup 2022 brazil beat serbia in opning match)

ब्राझीलचे प्रशिक्षक काय म्हणाले?

ब्राझीलचे प्रशिक्षक टिटे यांच्या म्हणण्यानुसार, 'नेमार विश्वचषकातून बाहेर पडणार नाही याची त्यांना पूर्ण खात्री आहे. सामन्यादरम्यान नेमारला जेव्हा दुखापत झाली तेव्हा तो वेदनांनी विव्हळत होता. मात्र असे असतानाही त्याने संघासाठी मैदानात राहण्याचा निर्णय घेतला. संघ खेळत असताना त्याने आपल्या दुखण्याकडे दुर्लक्ष केले, हे कौतुकास्पद आहे. नेमार विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. तो विश्वचषकात नक्कीच चांगली कामगिरी करेल.' (Neymar Injured fifa world cup 2022 brazil beat serbia in opning match)

दुखापतीमुळे स्वप्न भंगले

याआधी 2014 च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान नेमार जायबंदी झाला होता. कोलंबियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्याला पाठीला दुखापत झाली होती. त्यानंतर तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला होता. त्याचा परिणाम पुढील सामन्यांवर दिसून आला. उपांत्य फेरीच्या सामन्यात जर्मनीने 7-1 ने पराभूत करत बलाढ्य ब्राझीलचा धुव्वा उडवला होता. (Neymar Injured fifa world cup 2022 brazil beat serbia in opning match)

ब्राझील विरुद्ध सर्बिया सामन्यात काय झाले?

सर्वाधिक 5 वेळा विश्वचषक जिंकणा-या ब्राझील आणि तुल्यबळ सर्बिया यांच्यातील सामन्याचा पूर्वार्ध एकही गोल न होता बरोबरीत सुटला. यानंतर उत्तरार्धात ब्राझील संघाने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करताना दोन गोल केले. हे दोन्ही गोल संघाचा स्ट्रायकर रिचर्लिसनने केले आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 62 व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर 73 व्या मिनिटाला आणखी एक उत्कृष्ट गोल करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. जी सामना संपेपर्यंत कायम राहिली. आता ब्राझीलचा पुढील सामना 28 नोव्हेंबरला स्वित्झर्लंडशी होणार आहे. अशा परिस्थितीत नेमारची दुखापत फारशी गंभीर नसावी आणि तो स्वित्झर्लंडविरुद्ध करिष्मा दाखवताना दिसेल, अशी आशा चाहत्यांना आहे. (Neymar Injured fifa world cup 2022 brazil beat serbia in opning match)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news