पुणे: वक्फ मालमत्तांच्या वापराविषयी होणार विचारमंथन, राष्ट्रीय चर्चासत्रात तब्बल 40 तज्ज्ञ होणार सहभागी | पुढारी

पुणे: वक्फ मालमत्तांच्या वापराविषयी होणार विचारमंथन, राष्ट्रीय चर्चासत्रात तब्बल 40 तज्ज्ञ होणार सहभागी

पुणे, पुढारी वृत्तसेवा: वक्फ बोर्डाच्या मालमत्तांचा सुयोग्य वापर कसा करता येईल, यावर विचारमंथन करण्यासाठी पुण्यात 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी एका राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती माजी मुख्य आयकर आयुक्त ए. जे. खान यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी वकन फोरमचे संचालक मोहम्मद फरीद तुंगेकर आणि महाराष्ट्र वक्फ लिबरेशन अँड प्रोटेक्शन टास्क फोर्सचे अध्यक्ष सलीम मुल्ला उपस्थित होते.

कॅम्प परिसरातील आझम कॅम्पस येथे होणार्‍या या चर्चासत्रात देशभरातून विविध क्षेत्रातील तब्बल 40 तज्ज्ञ मान्यवर सहभागी होणार आहेत. अंडरस्टँडिंग ट्रू नेचर अँड मॅनेजमेंट ऑफ ऑकाफ फॉर बेटर प्रोटेक्शन, परफॉरर्मन्स अँड डेव्हलपमेंट’ हा या चर्चासत्राचा प्रमुख विषय असणार आहे.

देशातील विविध राज्यांमध्ये असणार्‍या विविध वक्फ बोर्डांअंतर्गत 8.6 लाख स्थावर आणि 16 हजार 674 जंगम मालमत्तांची नोंदणी करण्यात आली आहे. व्यवस्थापनाशी संबंधित असलेल्या समाज बांधवांनी या महत्त्वाच्या राष्ट्रीय मालमत्तेचे संरक्षण तसेच दारिद्र्य निर्मूलन, शिक्षण आणि आरोग्य सेवेसाठी विकास करण्यात मदत करण्याच्या दृष्टीने ‘रियल टाइम’ कामगिरी दाखवणे आवश्यक आहे. तसेच या मालमत्तांच्या माध्यमातून कर उत्पन्न आणि बेरोजगारी निर्मूलन होण्यासही हातभार लागेल, असा आशावाद खान यांनी व्यक्त केला आहे.

 

Back to top button