Messi : सौदी अरेबियाविरूद्धच्या सामन्यात मेस्सीला अनोखा ‘विक्रम’ करण्याची संधी | पुढारी

Messi : सौदी अरेबियाविरूद्धच्या सामन्यात मेस्सीला अनोखा 'विक्रम' करण्याची संधी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अर्जेंटिना मंगळवारी (दि.२२) फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना सौदी अरेबियाविरुद्ध खेळून आपल्या मोहिमेला सुरूवात करणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीवर (Messi) असतील. स्पर्धेत मेस्सीला अनोख्या विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे. जाणून घेऊयात त्या विक्रमाबद्दल…

अर्जेंटिना मंगळवारी (दि.२२) विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना सौदी अरेबियाविरुद्ध खेळून आपल्या मोहिमेला सुरूवात करणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीवर (Messi) असतील. स्पर्धेत मेस्सीला अनोख्या विक्रमाला गवसळी घालण्याची संधी आहे.

मेस्सीचा पाचवा फुटबॉल विश्वचषक

मेस्सीने शुक्रवार आणि शनिवारी एकटा सराव करताना दिसला होता. या सामन्यात सर्वांच्या नजरा मेस्सीच्या कामगिरीवर असणार आहेत. तसेच तो सौदी अरेबियाविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरताच आणखी एका विक्रमाला गवसणी घालणार आहे. मेस्सी हा पाच फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत खेळणारा खेळाडू ठरणार आहे. तसेच तोअँटोनियो कार्बाजाल यांच्याशी बरोबरी केली आहे. कार्बाजाल यानांही मेक्सिको संघासाठी पाच वेळा विश्वचषक स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. डिएगो मॅराडोना आणि जेव्हियर मास्चेरानो यांनी ४ वेळा विश्वचषक स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.

आंतरराष्ट्रीय सामन्यात १०० गोल करण्याची संधी

सौदी अरेबियाविरूद्धच्या सामन्यात मेस्सीला आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० गोलसंख्या करण्याची संधी आहे. त्याने आतापर्यंत अर्जेंटिनाकडून खेळताना ९१ गोल केले आहेत. पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो ११७ गोलांसह अव्वल स्थानावर विराजमान आहे.

हेही वाचा;

Back to top button