N Jagadeesan Record : धोनीच्या ‘सीएसके’ने काढून टाकलेल्या खेळाडूने केला विश्वविक्रम!

N Jagadeesan Record
N Jagadeesan Record
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'आयपीएल'च्या आगामी हंगामासाठी सर्व संघांनी कायम केलेले आणि सोडलेले खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यादरम्यान, चेन्नई संघाने आपल्या संघातील काही खेळाडूंना सोडले आहे. यामध्ये यष्टिरक्षक फलंदाज एन. जगदीशनच्या नावाचा ही समावेश आहे. जगदीशनला आतापर्यंत चेन्नईसाठी विशेष कामगिरी करता आली नाही. त्यामुळेच मिनी लिलावापूर्वी त्याला संघातून सोडण्यात आले होते. त्यानंतर जगदीशनने विजय हजारे ट्रॉफीमध्ये इतिहास रचला आहे. (N Jagadeesan Record)

तामिळनाडू संघाचा जगदीशनने विजय हजारे ट्रॉफी २०२२ च्या सहा डावात ७९९ धावा केल्या आहेत. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. यादरम्यान त्याने सलग पाच डावात शतक ठोकून विश्वविक्रम केला. या स्पर्धेत त्याची सरासरी १५९.८० आहे. आणि त्याचा स्ट्राइक रेट १२५.८२ आहे. (N Jagadeesan Record)

जगदीशनने अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात १४१ चेंडूत २७७ धावा केल्या. त्याच्या या शानदार खेळीमुळे तामिळनाडूने या सामन्यात दोन गडी गमावून 506 धावा केल्या. लिस्ट ए क्रिकेटमध्ये 500 हून अधिक धावा करणारा तामिळनाडू हा पहिला संघ आहे. या सामन्यात जगदीशनशिवाय साई सुदर्शननेही १५४ धावांची खेळी केली.

जगदीशनने मोडला श्रीलंकेच्या महान फलंदाजाचा विक्रम

विजय हजारे ट्रॉफीमधील पाचव्या शतकासह जगदीशन लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग शतक करणारा खेळाडू बनला आहे. त्याने श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकाराचा विक्रम मोडला आहे. संगकाराने २०१४-१५ साली झालेल्या वर्ल्डकपमध्ये सलग चार शतके झळकावली होती. भारताच्या देवदत्त पडिक्कलने २०२०-२१मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये सलग चार शतके झळकावली होती. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या अल्विरो पीटरसनने २०१५-१६ मोमेंटम एकदिवसीय चषक स्पर्धेत सलग चार डावात शतके झळकावली होती. सलग पाचव्या डावात शतक झळकावणारा जगदीशन पहिला फलंदाज ठरला आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news