MS Dhoni : धोनीची टीम इंडियात होणार एन्ट्री! BCCI देणार मोठी जबाबदारी | पुढारी

MS Dhoni : धोनीची टीम इंडियात होणार एन्ट्री! BCCI देणार मोठी जबाबदारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : MS Dhoni Team India : टी 20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा उपांत्य फेरीत इंग्लंडकडून दारुण पराभव झाला आणि पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले. यावेळी परिस्थितीने सर्वांनाच धक्का दिला आहे, त्यामुळेच टीम इंडियाची टी-20 खेळण्याची पद्धत पूर्णपणे बदलण्याची चर्चा सुरू झाला आहे. यासाठी बीसीसीआय पूर्णपणे तयार आहे का आणि मोठा बदल करण्यासाठी कोणती पावले उचलली जातील असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टेलिग्राफच्या वृत्तानुसार, बीसीसीआय टीम इंडियाच्या टी-20 संघाबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेणार आहे. याबाबत मंडळामध्ये चर्चा सुरू झाली आहे. यात हार्दिक पंड्याला टी-20 फॉरमॅटचा पूर्णवेळ कर्णधार बनवायचा किंवा टी-20 आणि वनडेमध्ये वेगवेगळे कर्णधार, प्रशिक्षक नेमायचे याविषयी चर्चाही सुरू असल्याचे समजते आहे. त्याचबरोबर ICC टूर्नामेंटमध्ये भारतीय संघ अपयशी ठरत असल्याने संघ व्यवस्थापनात बदल केला जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर महेंद्रसिंग धोनीचा टीम इंडियाच्या T20 संघात समावेश करण्याबाबत BCCI च्या अधिका-यांमध्ये चर्चा झाली आहे. (MS Dhoni Team India)

एमएस धोनीची भूमिका काय असेल?

धोनीने गेल्या वर्षी UAE मध्ये झालेल्या टी 20 विश्वचषकादरम्यान संघासोबत काम केले होते. तो त्या स्पर्धेत टीम इंडियाचा मेंटर होता. परंतु तो फक्त त्या स्पर्धेचा विषय होता आणि अचानक पणे घेण्यात आलेल्या त्या निर्णयाचा मोठा परिणाम दिसून आला नाही. पण यावेळी धोनीच्या नियुक्तीबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्याची चर्चा केली जात आहे. जेणेकरून टीम इंडियाला तीन त्याचे मोलाचे मार्गदर्शन मिळू शकेल. (MS Dhoni Team India)

रिपोर्टनुसार, धोनी आयपीएल 2023 नंतर आयपीएलला अलविदा म्हणू शकतो. अशा परिस्थितीत त्याच्याकडे वेळ असेल आणि बीसीसीआय त्याला टीम इंडियासोबत टी-20 फॉरमॅटमध्ये काम करण्यास सांगू शकते. कारण मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमध्ये काम करणे खूप कठीण होत आहे. (MS Dhoni Team India)

बीसीसीआय तातडीने मोठे बदल करणार का?

टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कप 2022 मध्ये पराभूत होऊन आठवडाही झाला नाही आणि अचानक खळबळ माजली आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय घाईघाईने कोणताही निर्णय घेईल की सर्व गोष्टी आरामात हाताळल्या जातील याकडे लक्ष लागले आहे. पुढचा टी 20 विश्वचषक 2024 मध्ये आहे, परंतु त्यापूर्वी 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा होणार आहे. अशा स्थितीत मंडळाने आतापासूनच मोहिमेला सुरुवात केली आहे. अशातच आता रोहित शर्माची कर्णधार पदावरून उचलबांगडी होणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (MS Dhoni Team India)

यावेळी टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप खेळला. भारतीय संघाने या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल गाठली. पण पुढे प्रगती करता आली नाही. इंग्लंडने उपांत्य फेरीत टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव केला. याचबरोबर टी-20 विश्वचषक जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले. भारताने 2007 मध्ये टी 20 विश्वचषक, 2011 मध्ये वनडे विश्वचषक, आणि 2013 मध्ये ICC ट्रॉफी जिंकली होती. या तिन्ही प्रसंगी महेंद्रसिंग धोनी टीम इंडियाचा कर्णधार होता. (MS Dhoni Team India)

Back to top button