T20 WC FINAL : जबरदस्त ‘स्टोक्स’! २०१६ मधील ‘व्‍हिलन’ आज ठरला इंग्‍लंडचा ‘हिरो’ | पुढारी

T20 WC FINAL : जबरदस्त 'स्टोक्स'! २०१६ मधील 'व्‍हिलन' आज ठरला इंग्‍लंडचा 'हिरो'

पुढारी ऑनलाईन डेस्क : मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या टी २० वर्ल्ड कप फायनलमध्ये (T20 WC FINAL) इंग्लंडने पाकिस्तानचा धुव्वा उडवला आणि ५ विकेट्स राखून विजेतेपद पटकावले. इंग्‍लंडच्‍या या विजयाचा हिराे ठरला बेन स्टोक्स.  आजच्‍या आपल्‍या खेळीने त्‍याने २०१६ च्या विश्वचषकातील पराभवाची कटू आठवण त्याने पुसून काढली आहे. २०१६ मधील इंग्‍लडनने विश्‍वचषक स्टोक्समुळे गमावला हाेता.

स्टोक्समुळे इंग्‍लंडने गमावला २०१६ चा वर्ल्ड कप

बेन स्टोक्सने आजच्या खेळीने २०१६ च्या विश्वचषकातील (T20 WC FINAL) पराभवाची आठवण पुसून काढली आहे. २०१६ च्या टी-२० विश्वचषकात देखील इंग्लंडने अंतिम फेरी गाठली होती. वेस्टइंडिज विरूद्ध इंग्लंड असा हा सामना रंगला होता. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना १५५ धावा केल्या होत्या आणि वेस्टइंडिज समोर १५६ धावांचे आव्हान ठेवले होते. हा सामना अतिशय रोमांचक झाला होता. शेवटच्या षटकात वेस्टइंडिजला २४ धावांची गरज होती. शेवटचे षटक बेन स्टोक्सने टाकले. वेस्टइंडिज अष्टपैलू खेळाडू कार्लॉस ब्रेथवेट याने स्टोक्सच्या पहिल्या ४ चेंडूवर ४ षटकार लगावले आणि विश्वचषक आपल्या नावावर केला होता.

२०१६ मधील ‘व्‍हिलन’ ठरलेला स्टोक्स आज ठरला ‘हिरो’

आज ( दि. १३ ) नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने इंग्लंडसमोर १३८ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात इंग्लडने बेन स्टोक्सच्या झुंझार अर्धशतकाच्या (नाबाद ५२) जोरावर १९ षटकांमध्ये ५ गडी गमावून १३८ धावांचे लक्ष्य गाठले. याचबरोबर इंग्लंडचा संघ टी २० क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा दुहेरी विश्वविजेता ठरला आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे जेतेपदही सध्या इंग्लंडकडे आहे. प्रथमच, एका संघाने एकाच वेळी एकदिवसीय आणि टी-२० या दोन्हीचे विश्वविजेतेपद पटकावले आहे. (T20 WC FINAL)

2016 वर्ल्ड कप फायनलमध्ये बेन स्टोक्सला शेवटच्या षटकात ४ षटकार लगावल्याने त्याचेवर टीकेची झोड उठली होती. अनेकांनी त्‍याला  निवृत्ती घेण्याचा सल्लाही दिला होता. मात्र, आज झालेल्या टी-२० विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्यात बेन स्टोक्सने नाबाद ५२ धावांची खेळी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला. त्याने ५ चौकार आणि १ षटकार लगावत अर्धशतक झळकावले. (T20 WC FINAL)

हेही वाचलंत का?

Back to top button