पुढारी ऑनलाईन डेस्क : फुटबॉल विश्वचषक २० नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. कतार येथे होणाऱ्या विश्वचषकात एकूण ३२ संघ सहभागी होणार आहेत. त्यात सध्याचा युरो कप विजेता आणि चार वेळा विश्वचषक (FIFA WC 2022) आपल्या नावावर केलेला दिग्गज इटली संघाला यंदा विश्वचषकासाठी पात्रता मिळवता आली नाही. विश्वचषक स्पर्धेमध्ये पात्रता मिळवू न शकणारा इटली हा एकमेव मोठा संघ नाही. तर इटलीसह आणखी पाच असे संघ आहेत की जे यंदाच्या विश्वचषकाला मुकणार आहेत. जाणून घेऊया त्या संघांबद्दल…
ब्राझीलनंतर सर्वाधिक फुटबॉल विश्वचषक जिंकणारा संघ हा इटली आहे. इटलीने चारवेळा फिफा विश्वचषक आपल्या नावावर केला आहे. त्यांनी १९३४, १९३८, १९८२, २००६ या साली विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. फिफा क्रमवारीत इटली सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. त्यांनी २०२१ साली झालेल्या युरो कप स्पर्धेत इंग्लंडचा अंतिम सामन्यात सडन डेथमध्ये ३-२ ने पराभव करत युरो कप जिंकला होता. (FIFA WC 2022) मार्चमध्ये प्लेऑफच्या उपांत्य फेरीत उत्तर मॅसेडोनिया विरूध्दच्या सामन्यात झालेल्या पराभवामुळे इटली विश्वचषक स्पर्धेच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला.
चिली हा संघ आतापर्यंत प्रत्येक विश्वचषक स्पर्धेचा भाग राहिला आहे. १९६३ मध्ये हा संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता. सध्या या संघाचे रँकिंग २९ आहे. कतार विश्वचषक स्पर्धेतील शेवटच्या चार पात्रता सामन्यांमधील फक्त एका सामन्यात जिंकला होता. या कारणामुळे चिलीला पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेतून बाहेर राहावे लागले आहे.
कोलंबिया फिफा क्रमवारीत कोलंबियाचा संघ १७ व्या क्रमांकावर आहे. ब्राझीलमध्ये झालेल्या २०१४ च्या विश्वचषक स्पर्धेत हा संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला होता. त्यावेळी संघाचा स्टार खेळाडू जेम्स रॉड्रिग्ज हा विश्वचषक स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केल्याने गोल्डन बूट विजेता ठरला होता. यावेळी तो खास कामगिरीकरून आपल्या संघाचे विश्वचषक स्पर्धेत स्थान निश्चित करू शकला नाही. कोलंबिया संघाची पात्रता अवघ्या एका गुणाने हुकली.
स्वीडन आतापर्यंत २१ पैकी १२ विश्वचषक खेळणारा स्वीडनचा संघ १९५८ च्या विश्वचषकात उपविजेता ठरला होता. गेल्या वर्षी कतार विश्वचषकाच्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या टप्प्यात स्वीडनने ६ पैकी ३ सामने गमावले होते. यामुळे संघाला गटात दुसरे स्थान मिळाले. प्लेऑफमध्ये पोलंडकडून पराभूत झाल्यामुळे स्वीडनचे कतार विश्वचषकात पोहोचण्याचे स्वप्न संपुष्टात आले. स्वीडनचे सध्याचे रँकिंग २५ आहे.
नायजेरिया आफ्रिकेतील नायजेरिया संघ आपल्या वेगवान खेळासाठी ओळखला जातो. हा देश १९९४ मध्ये पहिला विश्वचषक खेळला होता. तेव्हापासून आतापर्यंत फक्त २००६ साली विश्वचषक स्पर्धेत सहभागी होऊ शकला नव्हता. नायजेरियाने आतापर्यंत तीन वेळा राऊंड ऑफ १६ मध्ये स्थान मिळवले होते. संघाचे फिफा रँकिंग ३२ आहे. कतारमध्ये मोठ्या संख्येने नायजेरियन लोक काम करतात. त्यामुळे नायजेरिया संघाला कतारमध्ये नायजेरिया संघाला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला असता. नायजेरिया विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्यात अयशस्वी ठरल्यामुळे संघाच्या चाहत्यांसाठी ही गोष्ट अत्यंत निराशाजनक आहे.
हेही वाचा;