INDvsZIM T20WC : भारताचा झिम्बाब्वेवर दणदणीत विजय | पुढारी

INDvsZIM T20WC : भारताचा झिम्बाब्वेवर दणदणीत विजय

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : INDvsZIM T20WC : भारताने झिम्बाव्बेविरुद्धच्या सामन्यात ७१ धावांनी दणदणीत विजय मिळवत टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेत सेमी फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्यानंतर भारताचे सेमी फायनलचे तिकिट पक्के झाले होते. तरीही भारत झिम्बाव्बेविरुद्घच्या विजय मिळवण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरला. (India In Semi Final)

सूर्यकुमार यादवची दमदार खेळी आणि भारतीय गोलंदाच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने हा विजय संपादन केला.  भारताने प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वे समोर १८७ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताच्या १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाव्बेचा संघ ११५ धावाच करू शकला. टीम इंडियाने ७१ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. (India In Semi Final)

भारताकडून प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादव आणि के.एल.राहुलने दमदार फटकेबाजी केली. सूर्यकुमार यादवने २५ चेंडूमध्ये ६१ धावा फटकावल्या तर के.एल. राहुलने ३५ चेंडूमध्ये ५१ धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादव आणि के.एल. राहुल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने झिम्बाब्वे समोर १८७ धावांचे आव्हान दिले. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ ११५ धावाच करू शकला. भारताकडून रविचंद्रन अश्विनने ४ षटकांमध्ये २२ देत ३ विकेट्स पटकावल्या. तर मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी २ विकेट्स काढल्या. (India In Semi Final)

भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेकडून रेयान बर्ल आणि रजा सिकंदर शिवाय कोणीही उभे राहु शकले नाही. रेयान बर्लने २२ चेंडूमध्ये ३५ धावा केल्या तर रजा सिकंदरने २४ चेंडूमध्ये ३४ धावा फटकावल्या. तर गोलंदाजांमध्ये शॉन विलियम्स रिचर्ड नगारवा यांना प्रत्येकी २ विकेट पटकावण्यात यश आले. (India In Semi Final)

 

 

 

 

 

टी 20 विश्‍वचषक स्‍पर्धेत आज भारत विरुद्‍ध झिम्‍बाब्‍वे सामना सामना रंगला आहे. टीम इंडियाने टॅास जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर टीम इंडियाने 187 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. विजयासाठी आवश्यक 188 धावांचा पाठालाग करताना झिम्‍बाब्‍वेला एकामागोमाग एक झटके बसले.

झिम्‍बाब्‍वेच्या डावाच्या पहिल्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारने विकेट पटकावेली. ऑफ स्टंपच्या बाहेर गेलेला पहिलाच चेंडू सलामीवीर वेस्ली मधेवरेने कव्हर्समध्ये फटकावला. पण तिथे उभा असलेल्या कोहलीने पुढे झेपावत कसलीही चूक न करता कॅच पकडला. भुवीने हे एक विकेट पटकावर निर्धाव टाकले. यानंतर दुस-याच षटकात अर्शदीपने रेगिस चकाबवाला क्लिन बोल्ड करून पॅव्हेलियमध्ये पाठवले. 2 षटकाअखेर झिम्‍बाब्‍वेची धावसंख्या 2 बाद 2 होती. भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग यांनी पहिल्या चार षटकांत झिम्बाब्वेवर दबाव राखला. झिम्बाब्वेच्या फलंदाजाला 24 चेंडूत केवळ एक चौकार मारता आला. शॉन विल्यम्सने 6 व्या षटकात मोहम्मद शमीच्या चेंडूवर झिम्बाब्वेच्या डावातील पहिला षटकार ठोकला. 6 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद शमीने विल्यम्सला बाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. याचबरोबर भारताला तिसरी विकेट मिळाली. विल्यम्स 18 चेंडूत 11 धावा करून बाद झाला. 6 षटकांनंतर झिम्बाब्वेचा स्कोअर 3 बाद 28 होता. 6.4 व्या षटकात हार्दिक पंड्याला यश मिळाले. त्याने क्रेग एर्विनला (13) बाद करून चौथा झटका दिला. भुवी, अर्शदीप आणि मोहम्मद शमीनंतर हार्दिकलाही पहिल्याच षटकात विकेट मिळाली. 7वे षटक घेऊन आलेल्या हार्दिकने एर्विनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर 7.3 व्या षटकात शमीने झिम्बाब्वेला पाचवा झटका दिला. त्याने टोनी मुन्योंगा (5) याला पायचीत पकडले.

भारताने शेवटच्या 30 चेंडूत 79 धावा वसूल

भारतासाठी केएल राहुलनंतर सूर्यकुमार यादवने झंझावाती अर्धशतक ठोकले. राहुलने 35 चेंडूत 51 धावा केल्या, तर सूर्याने 25 चेंडूत 61 धावांची नाबाद खेळी केली. मधल्या षटकात राहुल आणि कोहली बाद झाल्यानंतर भारताच्या धावांचा वेग निश्चितच मंदावला होता, पण सूर्याने शेवटच्या 5 षटकांत त्याची भरपाई केली. भारताने शेवटच्या 30 चेंडूत 79 धावा वसूल केल्या.

रोहित शर्मा स्वस्तात बाद पण राहुल-सूर्याने डाव सावरला…

भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी संयमी सुरुवात केली. सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये दोघांनी 6 च्या रनरेटने 18 धावा केल्या. राहुलने तिसऱ्या षटकात सामन्यातील पहिला षटकार मारला. त्याचवेळी दुसऱ्याच षटकात रोहितने सामन्यातील पहिला चौकार लगावला. ही जोडी भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचवणार असे वाटत असतानाच चौथ्या षटकात पहिला झटका बसला. कर्णधार रोहित शर्मा 13 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 15 धावा करून माघारी परतला. त्याला मुजरबानीने बाद केले. चौथ्या षटका अखेर भारताची धावसंख्या 1 बाद 31 होती. रोहित बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानात उतरला. मैदानावर येताच त्याने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर केएल राहुलच्या जोडीने पाचव्या षटकात संयमी फलंदाजी केली. भारताचे अर्धशतक 7 व्या षटकात पूर्ण झाले. आठव्या षटकात केएल राहुलने आक्रमक फलंदजी केली. त्याने या षटकात एक षटकार, एक चौकार फटकावून 14 धावा वसूल केल्या. त्यानंतर 9 व्या षटकात तीन आणि 10 व्या षटकात 8 धावा मिळवल्या. 12 व्या आणि 13 व्या षटकात भारताला मोठे धक्के बसले. भारताच्या लागोपाठ दोन विकेट पडल्या. 12व्या षटकात शॉन विल्यम्सने विराट कोहलीला रायन बर्लेकरवी झेलबाद केले. कोहली 25 चेंडूत 26 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार मारले. विराट विल्यम्सच्या चेंडूवर चौकार मारण्याच्या प्रयत्नात होता पण डीप मिडऑफमध्ये बर्लेने त्याचा झेल घेतला. यानंतर, 13व्या षटकात केएल राहुलने सिकंदर रझाला षटकार ठोकून टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 22 वे अर्धशतक झळकावले. त्याचे या स्पर्धेतील हे पाचवे अर्धशतक ठरले. यानंतर पुढच्याच चेंडूवर राहुल पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात फसला. सीमारेषेवर त्याचा झेल पकडण्यात आला. राहुलने 35 चेंडूत 51 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार आणि तीन षटकार मारले. राहुल आणि कोहली यांच्यात 48 चेंडूत 60 धावांची भागीदारी. त्यानंतर मैदानात उतरलेल्या पंतने निराशा केली. भारताला 101 धावांवर ऋषभ पंतच्या रूपाने चौथा धक्का बसला. लाँग ऑन आणि मिड-विकेटच्या दिशेने विल्यम्सच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात त्याचा रायन बुर्लेने डाईव्ह शानदार झेल टीपला घेतला. 15 षटकांअखेर भारताची धावसंख्या 4 बाद 107 होती. 16 षटकात सूर्या आणि हार्दिक यांची जोडी रंगात आली. दोघांनी चौकारांची आतषबाजी करून चाहत्यांचे मनोरंजन केले. या षटकात चार चौकारांच्या सहाय्याने 18 धावा वसूल केल्या. या षटकाअखेर भारताने सव्वाशे धावांचा टप्पा पार केला होता. 17 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार आणि तिस-या चेंडूवर षटकार ठोकला. भारतीय जोडीने या षटकात 12 धावा चोपून मिळवल्या. 18 व्या षटकात भारताने 150 धावांचा टप्पा पार केला. या षटकात सूर्याने पुन्हा एकदा आक्रमण केले. दुस-या चेंडूवर चौकार आणि सहाव्या चेंडूवर षटकार ठोकला. या षटकात त्याने 15 धावा वसूल केल्या. तर 19 व्या षटकात 13 धावा चोपल्या. 19.2 व्या षटकात हार्दिक पंड्या 18 धावा काढून बाद झाला. पण सूर्याने उरलेल्या चेंडूवर अधिराज्य गाजवत 19.4 व्या षटकात अर्धशतक पूर्ण केले. त्याने या षटकात 21 धावा फटकावल्या. याचबरोबर भारतीय संघाची धावसंख्या 187 पर्यंत पोहचली.

ऋषभ पंतला संधी, दिनेश कार्तिकला विश्रांती

आजच्‍या सामन्‍यासाठी विकेटकिपर ऋषभ पंतला संधी देण्‍यात आली आहे. तर दिनेश कार्तिकला विश्रांती दिली आहे.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी अर्शदीप सिंह.

झिम्‍बाब्‍वे संघ : एर्विन क्रेग (कर्णधार), मधेवेरे वेस्ली, चकबवा रेजिस (विकेटकीपर), शाॉन विलियम्स, रजा सिकंदर, शुम्बा मिल्टन, रेयान बर्ल, मसाकाद्जा वेलिंग्‍टन, रिचर्ड नगारवा, तेंदई चटारा, ब्लेसिंग मुजरबानी

Back to top button