ENG vs SL : श्रीलंकेचा पराभव करत इंग्लंडची सेमी फायनलमध्ये धडक | पुढारी

ENG vs SL : श्रीलंकेचा पराभव करत इंग्लंडची सेमी फायनलमध्ये धडक

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी -२० विश्नचषकातील आज (दि.५) इंग्लंड विरूध्द श्रीलंका सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेवर ४ गडी राखून विजय मिळवला. सामन्यात श्रीलंकेने इंग्लंडला विजयासाठी १४२ धावांचे आव्हान दिले होते. या धावसंख्येचा पाठलाग हेल्स आणि कर्णधार जोस बटलर यांनी केलेल्या दमदार फलंदाजीच्‍या जाेरावर इंग्‍लंडने सेमी फायनलमधील आपले स्थान निश्चित केले.

श्रीलंकेने दिले १४२ धावांचे आव्‍हान

सामन्यात नाणेफेक जिंकत श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने पहिल्‍या तीन षटकांमध्‍ये ३२ धावा फटकावत दमदार सुरुवात केली. चौथ्या षटकामध्‍ये १८ धावांवर खेळणार्‍या कुसल मेडिंसला लियाम लिविंगस्टोन याने तंबूत धाडले. सहा षटकानंतर श्रीलंकेने १ गडी गमावत ५४ धावा केल्‍या. यानंतर नवव्या षटकामध्ये ९ धावांवर धनंजया डीसिल्वा याला सॅम करनने आऊ़ट केले. दहा षटकामध्ये श्रीलंकेने २ गडी गमावत ८० धावा केल्या होत्या. एका बाजून गडी बाद होत असताना दुसऱ्या बाजुला  पथुम निसांका उत्कष्‍ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. ११ व्‍या षटकात ८ धावांवर खेळणार्‍या चरित असलंकाला बेन स्टोक्सने बाद केले. ११ षटकामध्‍ये श्रीलंकेने ३ गडी गमावत ८४ धावा केल्‍या.

पथुम निसांका याने ३३ चेंडूत १ चाौकार, ४ षटकारांच्‍या साहाय्‍याने आपलं अधर्धशतक पूर्ण करत श्रीलंकेचा डाव सावरण्‍याचा प्रयत्‍न केला. १३ षटकामध्‍ये ३ गडी गमावत श्रीलंकेने १०० धावा केल्‍या. त्यानंतर सोळाव्या षटकांत श्रीलंकेला चौथा धक्का बसला. आदिल रशीदने निसांकाला ६७ धावांवर आउट केले

अठराव्या षटकांच्या शेवटच्या चेंडूवर मार्क वूडने दसून शनाकाला झेलबाद केले. विकेटच्या मागे जोस बटलरने हा झेल टिपला. शनाका केवळ ३ धावा काढून माघारी परतला. अखेरच्या षटकात वूडने श्रीलंकेला आणखी एक धक्का देत भानुका राजपक्षेची विकेट घेतली. याच षटकात हसरंगा ९ धावांवर धावचीत झाला.यानंतर डावाच्‍या अखेरच्‍या चेंडूवर इंग्‍लंडच्‍या  वूडने चमिका करुणारत्नेला बाद केले.  श्रीलंकेने पथुम निसांकाच्या ६७ (4५ चेंडू), कुसल मेंडिस १८ (14 चेंडू) आणि भानुका राजपक्षे २२ (22 चेंडू) धावांच्या जोरावर ८ गडी गमावत १४१ धावा केल्‍या.

इंग्‍लंडच्‍या गाेलंदाजांचे कमबॅक

१३ व्‍या षटकात श्रीलंका संघाने ३ गडी गमावत १०० धावा केल्‍या हाोत्‍या. त्‍यामुळे अखेरच्‍या सात षटकांमध्‍ये श्रीलंका दमदार फलंदाजी करत इंग्‍लंडसमाोर माोठ्या धावांचे आव्‍हान ठेवेल, असे मानले जात हाेते. मात्र, इंग्‍लंडच्‍या गाोलंदाजाीन कॅमबॅक केले. मार्क वुडने चार षटकांमध्‍ये २६ धावा देत ३ बळी घेतले. तसेच आदिल रशीद याने ४ षटकामध्‍ये १ विकेट घेत १६ धावा दिल्‍या. तसेच अन्‍य गाोलंदाजांनीही धावांची गती कमी केली. इंग्‍लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड याने ३, बेन स्टोक्स, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद यांनी प्रत्‍येकी एक विकेट घेतली.

इंग्‍लंडची सावध सुरुवात

श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्ंलडच्या सलमीवीर फलंदांजांनी सावध फलंदाजी करत धाव फलक हालता ठेवला. सलामी जोडीने सावध फलंदाजी करत पहिल्या षटकांत बिनबाद ७० धावा केल्या. बटलर आणि हेल्स यांनी दमदाऱ खेळी करत इंग्लंडला सुस्थित नेहले. या सलामीवीर जोडीने संथ गतीने फलंदाजी करत धावफलक हालता ठेवला. त्यांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये सावध फलंदाजी केल्यामुळे श्रीलंकन गोलंदाजांना इंग्लंडची सलामीची जोडी फोडण्यात यश आले नाही.

पहिला पावर प्ले संपल्यानंतर सलामीवीर जोडीने आक्रमक फलंदाजी करत धावा करण्यास सुरूवात केली. धावगती वाढवत असताना इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर २८ धावाकरून बाद झाला. त्याला हसरंगाने १० व्या षटकांत बाद केले.त्याच्या पाठोपाठ हसरंगाने हेल्सला बाद करत इंग्लंडला दुसरा धक्का दिला हेल्स ४७ धावातकरून बाद झाला.

इंग्लंडचा ४ गडी राखून विजय

हेल्स आणि बटलर बाद झाल्यानंतर स्टोक्स आणि ब्रूक हे फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले. त्यापैकी ब्रूक ४ धावाकरून स्वस्तात बाद झाला. त्याला धनंजय डी सिल्वाने सामन्यतील १४ व्या षटकांत बाद केले. सामन्यातील १३ व्या षटकांत इंग्लंडचा फलंदाज लिव्हिंगस्टोन ४ धावाकरून बाद झाला. त्याच्यी जागी फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेला मोईन अली चांगली कामगिरी करू शकला नाही. तो १५ व्या षटकांत १ धाव करून बाद झाला. त्याच्या जागी फलंदाजी करण्यासाठी आलेला सॅम करनही लगेच तंबूत परतला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात इंग्लंडने ४ गडी राखून श्रीलंकेविरूद्ध विजय मिळवला.

हेही वाचा;

Back to top button