Virat Kohli World Record : विराट कोहलीचा नवा विश्वविक्रम! T20 वर्ल्ड कपमध्ये रचला इतिहास

Virat Kohli World Record : विराट कोहलीचा नवा विश्वविक्रम! T20 वर्ल्ड कपमध्ये रचला इतिहास
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli World Record : टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत आज भारताचा सामना बांगलादेशशी होत आहे. अ‍ॅडलेड ओव्हलवर सुरू असलेल्या आजच्या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दोन्ही संघात एक बदल करण्यात आला आहे. अष्टपैलू अक्षर पटेलचे संघात पुनरागमन झाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात अक्षरच्या जागी दीपक हुडाचा प्लेईंग-11 मध्ये समावेश करण्यात आला होता. त्याचबरोबर बांगलादेशने अष्टपैलू सौम्या सरकारच्या जागी एका अतिरिक्त वेगवान गोलंदाजाला स्थान दिले आहे. शरीफुल इस्लाम हा सामना खेळत आहे.

या सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli World Record) एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. तो टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. बांगलादेशविरुद्ध अॅडलेडमध्ये 16 धावा करताच कोहलीने हा पराक्रम केला. याचबरोबर विराटने श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेला मागे टाकले आहे. विराटच्या आधी हा विक्रम जयवर्धनेच्या नावावर होता. त्याने टी 20 विश्वचषकाच्या इतिहासातील 31 सामन्यांमध्ये 39.07 च्या सरासरीने आणि 134.74 च्या स्ट्राइक रेटने 1016 धावा केल्या होत्या.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात कोहली जयवर्धनेपेक्षा 27 धावांनी मागे होता. विराट 28 धावा करून जयवर्धनेला मागे टाकू शकला असता, पण त्या सामन्यात तो 12 धावांवर बाद झाला आणि टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्यापासून वंचित राहिला. पण त्या सामन्यात कोहलीने एक विक्रम आपल्या नावावर केला होता. T20 विश्वचषकात हजार धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. (Virat Kohli World Record india vs bangladesh virat kohli become highest scorer in t20 world cup history)
एकंदरीत अशी कामगिरी करणारा तो महेला जयवर्धनेनंतरचा दुसरा फलंदाज आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणाऱ्या मोजक्या फलंदाजांपैकी कोहली एक आहे. 113 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कोहलीने 52.27 च्या सरासरीने आणि 138.34 च्या स्ट्राइक रेटने 3868 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एक शतक आणि 35 अर्धशतके झळकावली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news