IND VS SA World Cup : सूर्यकुमार यादवचे दमदार अर्धशतक, टीम इंडिया १०० पार

IND VS SA World Cup : सूर्यकुमार यादवचे दमदार अर्धशतक, टीम इंडिया १०० पार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज (दि.३०) टि-२० विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा सामना रंगणार आहे. हा सामना पर्थच्या मैदानावर खेळवला जात आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा सामना जो जिंकेल तो संघ उपांत्य फेरीत पोहचण्याची शक्यता आहे. (IND VS SA World Cup)

 सूर्यकुमार यादवचे दमदार अर्धशतक

भारताच्या एकामागे विकेट्स पडत असताना सूर्यकुमार यादवने दमदार अर्धशतक झळकवले आहे. त्याने ३ चौकार आणि ३ षटकार फटकावत अवघ्या ३० चेंडूत त्याने अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या या कामगिरीमुळे भारताने १०० धावांचा टप्पाही पार केला. १५ षटकांच्या खेळानंतर भारतीय संघाने ५ बाद १०१ धावा केल्या आहेत.

भारताला सलग तीन धक्के, के.एल.राहुल पाठोपाठ विराटही तंबूत परतला

लुंगी एनगिडीने भारतीय संघाला सलग तीन धक्के दिले आहेत. विराट कोहली ११ चेंडूमध्ये १२ धावांची खेळी करत तंबूत परतला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने तरबेज शम्सीच्या जागी लुंगी एनगिडीला संधी दिली होती.

IND VS SA World Cup : भारताला दुसरा धक्का, कर्णधार के.एल.राहुल बाद

लुंगी एनगिडीने रोहित शर्मा पाठोपाठ के.एल.राहुललाही बाद केले आहे. के.एल. राहुल १४ चेंडूमध्ये ९ धावा करत स्वस्तात माघारी परतला आह.

भारताला पहिला धक्का, कर्णधार रोहित शर्मा बाद

लुंगी एनगिडीने भारतीय संघाला पहिला धक्का दिला आहे. त्याने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला झेलबाद केले आहे. रोहित १३ चेंडूमध्ये १५ धावा करत तंबूत परतला आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत. ज्यामध्ये भारताने दोनही सामने जिंकून ४ गुण मिळवले आहेत. दक्षिण आफ्रिकेने एका सामन्यात दिमाखदार विजय मिळवला. तर आफ्रिकेचा एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. सध्या गुणतालिकेत भारत ४ गुण मिळवत प्रथम क्रमांकावर आहे. तर द.आफ्रिकेचा संघ ३ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. आजच्या सामन्यात वेगवान गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची असेल, असे मत तज्ज्ञांनी मांडले आहे. (IND VS SA World Cup)

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), दीपक हुड्डा, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग (IND VS SA World Cup)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news