मेलबर्न : पुढारी ऑनलाईन; मेलबर्नमधील संततधार पावसामुळे टी२० वर्ल्डकपमधील (T20 World Cup 2022) अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड यांच्यातील गट १ मधील आजचा सामना रद्द करण्यात आला आहे. पावसामुळे या सामन्याचा टॉसदेखील पडला नाही. पावसामुळे हा सामना रद्द झाल्याने याच ठिकाणी आज इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सामन्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आज शुक्रवारी (दि.२८) अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यातील सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर सकाळी ९.३० वाजता सुरु होणार होता. पण पावसामुळे हा सामना खोळबंला. पाऊस न थांबल्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण मिळाला आहे.
नियमानुसार पाच-पाच षटकांचा सामना खेळवण्याची निर्धारीत वेळ ११.४५ पर्यंत होती. पण तरीही या वेळेत पाऊस न थांबल्यामुळे सामना रद्द केला आहे. ग्रुप १ मध्ये आयर्लंड ३ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. आयर्लंडने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. तर अफगाणिस्तान सहाव्या स्थानावर कायम आहे. (T20 World Cup 2022)
कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामना याच मेलबर्न मैदानावर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता होणार आहे. पण पाऊस न थांबल्यास हा सामनादेखील रद्द होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :