SA vs BAN T20 : दक्षिण आफ्रिकेच्या भेदक मार्यासमोर बांगलादेशची शरणागती

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर रिले रोसोचे झंझावती शतक आणि क्विंटन डिकॉक तुफानी फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत आज ( दि. २७ ) बांगलादेशसमोर २०६ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र दक्षिण आफ्रिका संघाच्या भेदक मार्यासमोर बांगलादेशचा डाव १०१ धावांतच संपुष्टात आला. द. आफ्रिका संघाने हा सामना तब्बल १०४ धावांनी जिंकला आहे.
६६ धावांवर बांगलादेशचा निम्मा संघ तंबूत
२०६ धावांचा पाढलाग करताना बांगलादेशचे सलामीवीर नजमुल हुसेन शांतो आणि सौम्य सरकारने पहिल्या षटकात दमदार सुरुवात केली. सौम्य सरकारने सलग दोन षटकार फटकावत १७ धावा फटकावल्या. मात्र तिसर्या षटकामध्ये एनरिच नॉर्खियाने सौम्य सरकारला यष्टीरक्षक डी कॉककडे सोपा झेल दिला. यानंतर याच षटकाच्या तिसर्या चेंडूवर नॉर्खियाने शांतोला त्रीफळाचीत केले. बांगलादेशने तिसर्या षटकामध्ये २७ धावांवर दोन्ही सलामीवीरांना गमावले.
लिटन दासने धाव फलक हालता ठेवला आहे. मात्र पाचव्या षटकामध्ये एनरिच नॉर्खियाच्या गोलंदाजीवर शाकिब एलबीडब्ल्यू झाला. तर रबाडाच्या गोलंदाजीवर आफिफ हुसैनला पारनेलकडे सोपा झेल देणे भाग पाडले. आठ षटकांनंतर बांगलादेशने ४ गडी गमावत ५६ धावा केल्या. यानंतर ११ धावांवर खेळार्या मेहदी हसन मिराज याला तबरेज शम्सीने एडेन मार्करामने करवी झेलबाद केले. बांगलादेशने १० षटकांपर्यंत पाच गडी गमावत ६६ धावा केल्या.
बांगलादेशचा डाव १०१ धावांमध्ये गुंडाळला
मोसादेक हुसैन याला आपलं खातंही उघडता आलं नाही. केशव महाराजच्या गोलंदाजीवर डि कॉकने त्याला यष्टीचीत केले. शम्सीच्या गोलंदाजीवर जोरदार फटका लगावण्याच्या प्रयत्नात नुरुलने एनरिच नॉर्खियाकडे सोपा झेल दिला. नुरुल आपल्या नावावर केवळ दोन धावा नोंदवल्या.शम्सीच्या गोलंदाजीवर ट्रिस्टन स्टब्सने उत्कृष्ट झेल घेत संयमित फलंदाजी करणार्या लिटन दास हा शम्सीच्या तंबूत धाडले. लिटन दास याने ३१ चेंडूत ३४ धावा केल्या. यानंतर हसन मेहमूद शून्य धावांवर धावचीत झाला. यानंतर तस्कीन अहमद याला एनरिच नॉर्खियाने त्रीफळाचीत करत बांगलादेशचा डाव केवळ १०१ धावांमध्येच गुंडाळत विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
दक्षिण आफ्रिकेची दमदार फलंदाजी
दरम्यान, नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिका संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र पहिल्याच षटकामध्ये बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर टेम्बा बावुमा (कर्णधार) याला दोन धावांवर बाद केले. तस्कीन अहमदच्या गोलंदाजीवर त्याने यष्टीरक्षक लिटन दासकडे सोपा झेल दिला. यानंतर क्विंटन डी कॉक आणि रिले रोसोने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. डि कॉकने ३८ चेंडूत सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ६३ धावा केल्या. त्याला आफिफ हुसैनच्या गोलंदाजीवर सौम्य सरकारने झेलबाद केले. यानंतर ट्रिस्टन स्टब्स हा ७ धावांवर तंबूत परतला. हसन महमूदने १० धावांवर खेळणार्या एडेन मार्कराम बाद केले.
१५ षटकापर्यंत दक्षिण आफ्रिकेने दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. मात्र अखेरच्या पाच षटकांमध्ये बांगलादेशने कमबॅक केले. अखेरच्या पाच षटकामध्ये शाकिब अल हसन आणि , हसन महमूद यांनी भेदक मारा करत दक्षिण अफ्रिकेला रोखले. पाच षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकेने तीन गडी गमावत केवळ २९ धावांची भर घालत २०५ धावांचा टप्पा गाठला.
रोसोचे दमदार शतक
यानंतर अखेरच्या षटकांमध्ये झटपट धावा करण्याच्या प्रयत्ना शाकिबच्या गोलंदाजीवर रोसोने लिटन दास (विकेटकीपर) कडे झेल दिला. त्याने ५६ चेंडूत सात चौकार आणि ८ षटकार फटकावत १०९ धावांची खेळी केली. विशेष म्हणजे रोसो याचे हे सलग दुसरे शतक आहे.
Anrich Nortje has three wickets now with the in-form pacer getting the big wicket of Bangladesh skipper Shakib Al Hasan#T20WorldCup | #SAvBAN | 📝https://t.co/Ji9TL3CpQ9 pic.twitter.com/fq977tUWgn
— ICC (@ICC) October 27, 2022