भारताच्या विजयानंतर Google CEO चे ट्विट; पाक चाहत्याची केली बोलती बंद, म्हणाले… | पुढारी

भारताच्या विजयानंतर Google CEO चे ट्विट; पाक चाहत्याची केली बोलती बंद, म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (google ceo sundar pichai) यांनी सोमवारी ट्विटरवरून त्यांच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या टी 20 वर्ल्ड कपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचाही उल्लेख केला आहे. मात्र, एका पाकिस्तानी चाहत्याने सुंदर पिचाई यांना त्यांच्या पोस्टवरून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण गुगलचे सीईओ यांनीही त्या व्यक्तीला प्रत्युत्तर देत त्याची बोलतीच बंद केली आहे. पिचाई यांच्या या प्रत्युत्तराला चांगलीच पसंती मिळत आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे.

दिवाळीच्या शुभेच्छा देताना पिचाई (google ceo sundar pichai) यांनी ट्विट म्हटलंय की, ‘दिवाळीच्या शुभेच्छा! आशा आहे की उत्सव साजरा करणारा प्रत्येकजण आपल्या मित्रांसह आणि कुटुंबासह चांगला वेळ घालवत असेल. शेवटची तीन षटके पाहून मी आज पुन्हा आनंद साजरा केला, काय अप्रतिम खेळ आणि कामगिरी!’

पिचाई (google ceo sundar pichai) यांनी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातील शेवटच्या तीन षटकांच्या थरारक संघर्षाचा उल्लेख केला आहे. यावेळी टीम इंडिया धावांचा पाठलाग करत होता आणि मैदानावर विराट कोहली आणि हार्दिक पंड्या खेळत होते. अखेर कोहलीच्या झुंझार खेळीच्या जोरावर भारताने शेवटच्या चेंडूवर कट्टर प्रतिस्पर्धी पाकविरुद्ध रोमांचक विजय मिळवला.

सुंदर पिचाई (google ceo sundar pichai) यांच्या ट्विटवरून पाकिस्तानच्या मुहम्मद शाहजेब यांनी कमेंट करून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्याने पिचाई यांना एक सल्ला देत ‘पहिली तीन षटके पाहिली पाहिजेत’ असा खोचक टोला लगावला. त्यानंतर मुहम्मद शाहजेब यांच्या या कमेंटला उत्तर देताना पिचाई यांनीही खरमरीत प्रत्युत्तर दिले. ‘ते सुद्धा केले… भुवी आणि अर्शदीपचा काय स्पेल होता,’ असा टोमणा लगावला. पिचाई यांच्या हजरजबाबीपणाचे सोशल मीडियात कौतुक होत आहे.

Image

असा झाला सामना…. (google ceo pichai tweet on ind vs pak T20 match)

रविवारी (दि. 23) झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा थरार शेवटच्या चेंडू पर्यंत अनुभवायला मिळाला. पाकिस्तान टॉस गमावला त्यानंतर पहिला फलंदाजी 8 गड्यांच्या मोबदल्यात 159 धावा केल्या. त्यानंतर विजयासाठी आवश्यक 160 धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव गडगडला. पण रन मशिन विराट कोहली आणि हार्दिक पंड्याने भक्कम भागिदारी करून टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचवले. अखेरच्या षटकात भारतीय संघाला विजयासाठी 16 धावांची गरज होती. हार्दिक पंड्या पहिल्या चेंडूवर बाद झाला, तर दिनेश कार्तिकने दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली आणि तो दुसऱ्या टोकाला गेला. तिसऱ्या चेंडूवर विराट कोहलीने (Virat Kohli) 2 धावा काढल्या, तर चौथ्या चेंडूवर मोहम्मद नवाजने फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू वेस्ट हाईटपेक्षा उंच असल्याने पंचांनी तो चेंडू नो बॉल असल्याचा निर्णय दिला. नो बॉल घोषीत करताच पाकिस्तान संघातील खेळाडूंनी पंचांशी बराच वाद घातला. पण विराट कोहलीने फटका मारल्यानंतर लगेचच त्या चेंडूबाबत तक्रार केली होती. पंचांनी विराटच्या (Virat Kohli) पारड्यात निर्णय देत नो बॉल जाहीर केला. त्यामुळे भारताला अतिरिक्त चेंडू आणि धावही मिळाली. भारताने पहिल्या तीन चेंडूत फक्त 3 धावा घेतल्या होत्या, तर चौथ्या चेंडूवर नो बॉल आणि षटकार मारला. त्यामुळे आता 3 चेंडूत एकूण 6 धावांची गरज होती. पुढचा चेंडू नवाजने वाईड टाकला. त्यानंतरच्या फेकलेल्या चेंडूवर विराटने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण हा चेंडू हुकला आणि विकेटवर आदळून विकेटच्या मागे गेला. पण फ्री हिटवर क्लीन बोल्ड दिले जात नसल्याने याचा फायदा घेत डीके आणि विराटने तीन धावा काढल्या. आता पुढच्या दोन चेंडूत दोन धावा हव्या होत्या. पुढच्या चेंडूवर दिनेश कार्तिक स्टंप आऊट झाला. त्यानंतर आर अश्विन मैदानात उतरला. नवाजने पहिला चेंडू अश्विनकडे वाइड फेकला आणि पुढच्याच चेंडूवर अश्विनने चौकार मारला. याचबरोबर भारताने रोमहर्षक विजय मिळवून भारतीयांना धमाकेदार दिवाळी गिफ्ट दिले. (Babar vs ICC Umpire IND vs PAK T20 World Cup 2022)

Back to top button