

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर-१२ फेरीतील सामन्यात भारताने पाकिस्तानचा ४ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने आठ गडी गमावून १५९ धावा केल्या. विजयासाठीचे लक्ष्य भारताने ६ विकेट्स गमावून पूर्ण केले. या विजयासह टीम इंडियाने २०२१ च्या टी-२० विश्वचषकातील पराभवाचा बदला घेतला. (Virat Kohli)
सामन्याचा विजयी शेवट झाल्यानंतर सर्व खेळाडू भावूक झाले. कोहलीसोबतच कर्णधार रोहित शर्मालाही आपले अश्रू आवरता आले नाहीत. सामन्यानंतर रोहित म्हणाला की, माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच उरले नाहीत. विराटने शानदार खेळी केली आहे. त्याच्या झुंझार खेळी समोर नतमस्तक त्याला सलाम करतो. या सामन्यातून भारताला नवी ऊर्जा मिळाली आहे. भारताने टी-२० विश्वचषकाची सुरुवात विजयाने केली. (Virat Kohli)
रोहित म्हणाला, "मी ड्रेसिंग रूममध्ये होतो. माझ्याकडे शब्दच उरले नाहीत. आम्हाला जास्तीत जास्त वेळ खेळात राहायचे होते. कोहली आणि पंड्या यांच्यातील महत्त्वपूर्ण भागीदारीने सामना भारताच्या बाजूने आणला. खेळपट्टी खूप चांगली होती. गोलंदाजीला मदत करत होती."
इफ्तिखार आणि मसूद यांच्या भागीदारीबद्दल तो म्हणाला, "त्यांची चांगली भागीदारी होती. त्याने शेवटपर्यंत चांगली फलंदाजी केली. १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल हे माहीत होते. शांत राहणे आणि चांगला खेळ करणे हे खूप महत्वाचे होते. हा विजय आमच्या आत्मविश्वासासाठी चांगला आहे.
रोहित म्हणाला, "एक वेळ अशी होती की आम्ही सामना गमावला असं वाटतं होत. परंतु आम्ही ज्या प्रकारे जिंकलो ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. विराटने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, भारतासाठी खेळलेली त्याची ही सर्वोत्तम खेळी आहे. त्याला सलाम. मी सर्व प्रेक्षकांचे आभार मानू इच्छितो, हे पाहणे खूप छान आहे. आम्ही कुठेही जातो, त्यांचा पाठिंबा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो."
हेही वाचा;