IND vs PAK IN T20 World Cup : टी-२० विश्वचषकात भारत-पाक सहावेळा भिडले, जाणून घ्या कोण कोणावर भारी? | पुढारी

IND vs PAK IN T20 World Cup : टी-२० विश्वचषकात भारत-पाक सहावेळा भिडले, जाणून घ्या कोण कोणावर भारी?

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-२० विश्वचषक २०२२ मधील भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना २३ ऑक्टोंबरला ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात मैदानावर उतरणार आहे. तर पाकिस्तानचे नेतृत्व बाबर आझम करेल. भारत विरूद्ध पाकिस्तान या सामन्याची प्रेक्षक आतूरतेने वाट पाहत असतात. आशिया चषकानंतर प्रथमच भारत-पाक टी-२० विश्वचषकात आमने-सामने येणार आहेत. (IND vs PAK IN T20 World Cup)

आजवर टी-२० विश्वचषकात भारत आणि पाक दरम्यान एकूण ६ सामने खेळवण्यात आले आहेत. यातील सहा सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड राहिले आहे. तर फक्त एका सामन्यात पाक भारतावर भारी पडला आहे.

१. २००७ चा टी-२० विश्वचषक : टी-२० विश्वचषकातील पहिला भारत वि. पाक सामना २००७ साली दक्षिण आफ्रिकेच्या डर्बनमध्ये खेळवण्यात आला होता.  या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत असताना १४१ धावा केल्या होत्या. याच्या प्रत्युत्तरात पाकिस्ताननेही १४१ धावाच केल्या आणि सामन्यात दोन्ही संघाच्या धावा तितक्याच झाल्या. यानंतर या सामन्याचा निकाल बॉल आऊटद्वारे लावण्यात आला होता. या बॉलआऊटमध्ये भारताने ३-० ने बाजी मारली होती. (IND vs PAK IN T20 World Cup)

२. २००७ विश्वचषकाचा अंतिम सामना : २००७ टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताची पुन्हा पाकिस्तानशी गाठ पडली. अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर भारताने पाकसमोर १५८ धावांचे आव्हान दिले. प्रत्यूत्तरात पाकिस्तानचा संघ १५२ धावा करू शकला. या सामन्यात पाकिस्तानच्या मिसबाहने अखेर पर्यंत झुंज दिली होती. भारत पाकिस्तान दरम्यान आतापर्यंत झालेल्या अत्यंत थरारक सामन्यापैकी हा एक सामना मानला जातो.

. २०१२ विश्वचषक : २००७ नंतर पाच वर्षांनी भारत-पाक २०१२ साली आमने-सामने आले होते. श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये खेळवल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानने १२८ माफक आव्हान भारतासमोर ठेवले. या सामन्यात लक्ष्मीपती बालाजीच्या आक्रमक गोलंदाजी समोर पाकच्या गोलंदाजांनी अक्षरशा: गुढघे टेकले होते. भारताकडून विराट कोहलीने ७८ धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला होता. (IND vs PAK IN T20 World Cup)

४. २०१४ विश्वचषक : २०१२ नंतर दोन वर्षांनी २०१४ ला भारत पाक पुन्हा एकदा आमने-सामने आले होते. ढाका येथे खेळवण्यात आलेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत १३० धावा केल्या होत्या. भारताकडून अमित मिश्राच्या फिरकीपुढे पाकिस्तानची फलंदाजी फिकी पडली. पाकिस्तानने दिलेल्या १३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी भारताला १९ व्या षटकात विजय मिळवून दिला होता. (IND vs PAK IN T20 World Cup)

५. २०१६ विश्वचषक : २०१६ चा विश्वचषक भारतात खेळवण्यात आला होता. या विश्वचषकात भारत वि. पाक हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळवण्यात आला होता. विराट कोहली आणि युवराज सिंग यांच्या कसलेल्या फलंदाजीमुळे अटीतटीचा सामन्यात भारताने विजय संपादन केला. या सामन्यात विराट ५५ धावांचे योगदान देत अखेरपर्यंत नाबाद राहिला व भारताने हा सामना ६ विकेट्सने जिंकला होता. (IND vs PAK IN T20 World Cup)

६. २०२१ विश्वचषक : २०२१ च्या टी २० विश्वचषकात भारत वि. पाक हा सामना खेळवण्यात आला होता. दुबईत खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १५१ धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदीने ३ विकेट्स पटकावत भारताला १५१ धावांपर्यंत रोखण्यासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली होती. भारताने दिलेल्या १५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मोहम्मद रिझवानने ७९ तर बाबर आझमने ६८ धावांची खेळी करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता. टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच पाकिस्तानने भारताला नमवले होते. (IND vs PAK IN T20 World Cup)

हेही वाचलंत का?

Back to top button