T20 World Cup मध्ये मोठा उलटफेर, आयर्लंडनं दोनवेळच्या चॅम्पियनला हरवलं, वेस्ट इंडिज स्पर्धेतून बाहेर

T20 World Cup मध्ये मोठा उलटफेर, आयर्लंडनं दोनवेळच्या चॅम्पियनला हरवलं, वेस्ट इंडिज स्पर्धेतून बाहेर
Published on
Updated on

T20 World Cup : आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज मोठा उलटफेर दिसून आला. आयर्लंडने दोनवेळच्या चॅम्पियन वेस्ट इंडिजचा नऊ गडी राखून पराभव केला. यामुळे वेस्ट इंडिजचे आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. वेस्ट इंडिजने २०१२ आणि २०१६ मध्ये विश्वचषक जिंकला होता. पण आता वेस्ट इंडिज पात्रता फेरीतच विश्वचषक स्पर्धेतून बाहेर गेली आहे. आयर्लंडने २००७ मध्ये विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानला बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्याचप्रमाणे २०११ मध्ये त्याने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून इग्लंडला बाहेर घालवले होते.

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी केली. त्यांनी २० षटकांत पाच गड्यांच्या बदल्यात १४६ धावा करत आयर्लंडला १४७ धावांचे लक्ष्य दिले होते. वेस्ट इंडिजकडून ब्रँडन किंगने सर्वाधिक ६२ धावा केल्या. हे लक्ष्य आयर्लंडने सहज पार केले. आयर्लंडने १७.३ षटकांत केवळ एक विकेट गमावून १५० धावा कुटत सामना जिंकला. आयर्लंडचा स्फोटक फलंदाज पॉल स्टर्लिंग याने ४८ चेंडूत ६६ ध‍ावांची खेळी केली. तर लोर्कन टूकर ३५ चेंडूत ४५ धावा काढून नाबाद राहिला.

या सामन्यातील विजेता आयर्लंड आता सुपर १२ राउंडसाठी पात्र ठरला असून वेस्ट इंडिज स्पर्धेतून बाहेर गेला आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news