रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू! ज्याने आजपर्यंतच्या टी-२० सामन्यांचा केला रेकॉर्ड | पुढारी

रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू! ज्याने आजपर्यंतच्या टी-२० सामन्यांचा केला रेकॉर्ड

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुवाहाटीमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामना आज खेळला जात आहे. भारताने पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी नाणेफेक करताना रोहितने क्रिकेटच्या मैदानावर आणखी एक नवा विक्रम केला आहे. त्यामुळे सगळीकडे रोहितच रोहित शर्मा ची चर्चा सुरु आहे.

अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय आणि जगातील नववा क्रिकेटपटू

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी २० सामन्यात रोहितने आणखी एक कामगिरी केली आहे. ४०० टी-२० सामने खेळणारा तो पहिला भारतीय आणि जगातील नववा क्रिकेटपटू ठरला आहे. रोहित शर्मा, दिनेश कार्तिक आणि एमएस धोनी हे एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहेत ज्यांनी टी२० करिअर मध्ये २५० पेक्षा जास्त सामने खेळले आहेत. रोहित २००७ च्या विश्वचषकापासून टी२० सामने खेळत आहे.

जगात सर्वाधिक टी२० सामने खेळण्याचा विक्रम केरॉन पोलार्डच्या नावावर

जगात सर्वाधिक टी२० सामने खेळण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू केरॉन पोलार्ड याच्या नावावर आहे. पोलार्डने आतापर्यंत ६१४ टी२० सामने खेळले आहेत. त्याच्यानंर वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्हो (५५६), शोएब मलिक (४८१), ख्रिस गेल (४६३), सुनील नरेन (४३५), रवी बोपारा (४२९), आंद्रे रसेल (४२८) आणि डेव्हिड मिलर (४०२) यांचा टी२० सामने खेळण्याचा क्रमांक लागतो.

सर्वाधिक टी२० सामने खेळलेले भारतीय

४०० टी-२० सामने खेळणारा तो पहिला भारतीय रोहित शर्मा ठरला आहे. रोहितनंतर दिनेश कार्तिक याने ३६८ सामने खेळले आहेत तर एमएस धोनीने ३६१ सामने खेळले आहेत. विराट कोहलीने आतार्यंत ३५४ सामने खेळले आहेत.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सुरू असलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताकडून सुर्यकुमार यादवने ५ चौकार आणि ५ षटकार लगावत २२ चेंडूमध्ये ६१ धावा काढल्या. तर के.एल. राहुलने ५ चौकार आणि ४ षटकार लगावत २८ चेंडूमध्ये ५७ धावा काढल्या. सुर्यकुमार यादव आणि के.एल.राहुल यांच्या पाठोपाठ विराट कोहलीनेही २८ चेंडूमध्ये ४९ धावांची खेळी केली.

 

 

Back to top button