IND vs SA : तळपता ‘सूर्य’ हजार नंबरी; सूर्यकुमार यादव अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय | पुढारी

IND vs SA : तळपता ‘सूर्य’ हजार नंबरी; सूर्यकुमार यादव अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय

पुढारी ऑनलाईन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादवने शानदार अर्धशतक झळकावले. या सामन्यात त्याने अनेक विक्रम केले. २०२२ मध्ये सुर्यकुमार टी२० क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे. त्याचा परिणाम आयसीसी क्रमवारीतही दिसून येत असून आता सूर्यकुमारला आणखी एक कामगिरी करण्याची संधी आहे.

आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १००० धावांचा टप्पा पूर्ण (IND vs SA)

सूर्यकुमार यादव आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण करण्यासाठी त्याला २४ धावांची आवश्यकता होती. दुसऱ्या टी२० मध्ये सूर्यकुमारने २४ धावा करून टी 20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण केल्या आहेत. सूर्यकुमार वेगवान १००० धावांचा टप्पा पूर्ण करणारा तिसरा भारतीय ठरला आहे.

भारताकडून सर्वाधिक वेगवान १००० धावा विराट कोहलीच्या नावावर

भारताकडून टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान १००० धावा विराट कोहलीच्या नावावर आहेत. विराटने २७ इनिंगमध्ये एक हजार धावांचा टप्पा पुर्ण केला आहे. तर भारताकडून केएल राहुलने २९ इनिंगमध्ये हजार धावांचा टप्पा गाठला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्‍ध दमदार पहील्या टी २०मध्ये सूर्यकुमारची दमदार फलंदाजी

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेतील पहिल्‍याच सामन्‍यात धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि विराट कोहली झटपट बाद झाले. भारताची अवस्‍था बिकट झाली होती. यानंतर सूर्यकुमार यादवने ३३ चेंडूत ५० धावांची दमदार खेळी केली. त्‍याने ५ चौकार आणि ३ उत्तुंग षटकार लगावले. त्‍याच्‍या या खेळीने भारताचा विजय स्‍पष्‍ट झाला.

मोहम्‍मद रिझवानचा विक्रम मोडीत

सूर्यकुमार यादव याने पाकिस्‍तानचा आघाडीचा फलंदाज मोहम्‍मद रिझवान याला मागे टाकले आहे. रिझवान याने मागील वर्षी म्‍हणजे २०२१ मध्‍ये टी-२० क्रिकेटमध्‍ये ४२ षटकार ठोकले होते. त्‍याने एका वर्षात सर्वाधिक षटकार फटकविण्‍याचा रेकॉर्ड केला होता. हा रेकॉर्ड सूर्यकुमारने मोडला आहे. त्‍याने २०२२ या वर्षात आतापर्यंत ४५ षटकार ठोकले आहेत. या कामगिरीमुळे एक वर्षात सर्वाधिक षटकार ठोकण्‍याचा विक्रम त्‍याने आता आपल्‍या नावावर केला आहे. विशेष म्‍हणजे, ऑक्‍टोबर महिन्‍यात टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धा होणार आहे. त्‍यामुळे सूर्यकुमार याच्‍या नावावर आणखी षटकार नोंदले जाणार आहेत.

Back to top button