T20 World Cup : बुमराहची जागा आता कोण घेणार? | पुढारी

T20 World Cup : बुमराहची जागा आता कोण घेणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह T20 विश्वचषकातून बाहेर पडल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह वर्ल्डकपमध्ये खेळू शकणार नाही. पीटीआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे की, बुमराहवर शस्त्रक्रिया होणार नाही, मात्र त्याला चार ते सहा महिने क्रिकेटपासून लांब रहावे लागेल. त्यामुळे बुमराहला अनुपस्थितीमध्ये त्याची जागी कोणाला संधी मिळणार याकडे  सर्वांचे लक्ष लागले आहे. (T20 World Cup)

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 मालिकेतील पहिला सामना बुमराह खेळू शकला नव्‍हता. त्‍याच्‍याऐवजी दीपक चहरला संधी देणय्‍ता आली होती. आशिया चषक स्‍पर्धेला मुकलेल्‍या बुमराह याने ऑस्‍ट्रेलिया विरुद्‍धच्‍या T20 मालिकेत पुनरागमन केले होते. मात्र, या मालिकेतील पहिल्‍या सामन्‍यात त्‍याला विश्रांती देण्‍यात आली होती.  विश्वचषकामध्ये वेगवान गोलंदाजीची धूरा अनुभवी जसप्रीत बुमराहकडे होती. आता तो संघात नसल्यामुळे त्याची जागा कोणता गोलंदाज घेणार हा प्रश्न सर्वांसमोर पडला आहे. या समस्येवर बीसीसीआयने अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. (T20 World Cup)

बुमराहची जागा कोण घेणार ?

आता टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेमधून बुमराह बाहेर पडल्‍याने त्‍याची जागा कोण घेणार ? हा मोठा प्रश्‍न आहे. सध्‍या तरी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्‍मद शमी किंवा दीपक चहर या दोघांची नावे आघाडीवर आहेत. मोहम्‍मद शमी याला कोरोनाची लागण झाली होती. त्‍यामुळे तो ऑस्‍ट्रेलिया आणि त्‍यानंतर दक्षिण आफ्रिेकेविरुद्‍च्‍या T20 मालिकांना मुकला. मात्र टीम इंडियासाठी एक सकारात्‍मक बातमी म्‍हणजे, शमी हा कोरोनामुक़्‍त झाला आहे. त्‍यामुळे चहरबरोबर आता बुमराहच्‍या जागी त्‍याचाही विचार होईल, असे मानले जात आहे.

दीपक चहर आणि मोहम्मद शमीची T20 मधील कामगिरी

दीपक चहर

दीपक चहरने त्याचे T20 मधील पर्दापण 2018 साली इंग्लंडविरूध्द केले होते. त्याने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 22 सामने खेळले आहेत. त्याने 22 सामन्यांत 8.09 च्या इकॉनॉमीने 629 धावा देत 28 विकेट घेतल्या आहेत.

मोहम्मद शमी

मोहम्मद शमीने 2014 साली पाकिस्तान विरूध्दच्या सामन्यातून T20 मध्ये पदार्पण केले. त्याने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 17 सामने खेळले आहेत. त्याने 17 सामन्यात त्याने 9.55 इकॉनॉमीने 568 धावा देत 18 विकेट घेतल्या आहेत.

हेही वाचा; 

Back to top button