Virat Kohli : रोहित शर्माचा ‘हा’ विक्रम आपल्या नावावर करण्याची विराटला संधी | पुढारी

Virat Kohli : रोहित शर्माचा 'हा' विक्रम आपल्या नावावर करण्याची विराटला संधी

पुढारी ऑनलाईन डेस्क : हैदराबादमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात विराट कोहलीविराट कोहलीने ६३ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. फॉर्ममध्ये परत आलेल्या विराट कोहलीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धावा करून रोहित शर्माचा दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. (Virat Kohli)

T20 विश्वचषकाच्या आधी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची T20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी (दि. २८ सप्टेंबर) रोजी तिरुवनंतपुरम येथे खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 2-1 अशा विजयानंतर भारतीय संघाची नजर आणखी एक मालिका जिंकण्यावर आहे. (Virat Kohli )

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने 13 सामन्यात 362 धावा केल्या आहेत. त्याला मागे टाकण्याची विराटला संधी आहे. त्‍याने आफ्रिकन संघाविरुद्ध 10 सामन्यात 254 धावा केल्या आहेत. रोहितशिवाय भारताचा माजी फलंदाज सुरेश रैना त्याच्या पुढे आहे. रैनाच्या नावावर 339 धावा आहेत. विराटला रैनासह रोहितलाही मागे सोडण्याची संधी आहे. तो रैनाच्या 85 धावांनी तर रोहितच्या 108 धावांनी मागे आहे. कोहलीच्या नावावर आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 33 अर्धशतके आहेत.

याआधी कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन अर्धशतके झळकावली आहेत. अर्ध शतकाच्या बाबतीतही विराट रोहितला मागे टाकू शकतो. त्याने ही कामगिरी केली तर तो आफ्रिकन संघाविरुद्ध T20I मध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावणारा भारतीय ठरणार आहे.

हेही वाचा;

Back to top button