

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण आफ्रिका संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील T-20 मालिकेला 28 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ तिरुअनंतपुरमला पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ आधीच येथे आला असून ते सराव करत आहेत. हैदराबादमधील ऑस्ट्रेलियाविरुद्ध T-20 मालिका संपवून भारतीय संघ तिरुवनंतपुरमला पोहोचला आहे. टीम इंडियाचा हैदराबाद ते तिरुवनंतपुरम हा संपूर्ण प्रवासादरम्यानचा व्हि़डिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. (IND vs SA T20)
हैदराबादमधून बाहेर पडल्यानंतर मालिका विजयाचे सेलिब्रेशन करत भारतीय संघ तिरुवनंतपुरमला पोहोचला. तेथे टीम इंडियाच्या खेळाडूंना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती. दरम्यान, चाहत्यांनी खेळाडूंचे फोटो काढले. तिरुवनंतपुरममधील लोकांमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंची मोठी क्रेझ आहे. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी भारतीय संघ, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफला पुष्पहार घालून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचेदेखील अशाच पध्दतीने स्वागत करण्यात आले होते.. (IND vs SA T20)
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना 28 सप्टेंबर रोजी होणार आहे. हा सामना तिरुवनंतपुरममध्ये खेळवण्यात येणार आहे. यानंतर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरूध्द गुवाहाटी आणि इंदूरमध्ये खेळायचे आहे. T20 मालिकेनंतर दोन्ही संघ तीन एकदिवसीय सामनेही खेळणार आहेत. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी लखनऊमध्ये होणार आहे. यानंतर दुसरा सामना 9 ऑक्टोबरला रांचीमध्ये तर तिसरा सामना 11 ऑक्टोबरला दिल्लीत होणार आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, शाहबाज अहमद.
दक्षिण आफ्रिका संघ : टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, रिले रुस्सो, ताबर्सी रुस्सो. ट्रिस्टन स्टब
हेही वाचा;