Indian Openers Records : विराट की राहुल, सलामीसाठी कुणाचे रेकॉर्ड हिट? जाणून घ्या आकडेवारी

Indian Openers Records : विराट की राहुल, सलामीसाठी कुणाचे रेकॉर्ड हिट? जाणून घ्या आकडेवारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : Indian Openers RECORDS : आगामी टी 20 विश्वचषक स्पर्धेत विराट कोहली टीम इंडियाचा तिसरा सलामीवीर असेल, असे भारतीय कर्णधार रोहित शर्माने रविवारी स्पष्ट केले. यासोबतच केएल राहुल हा संघाचा मुख्य सलामीवीर तर विराट पर्यायी खेळाडू म्हणून उपलब्ध असेल, पण विश्वचषक स्पर्धेतील काही सामन्यांमध्ये विराटही सलामी करू शकतो, असेही त्याने सांगितले. (virat kohli and kl rahul indian openers records in t20)

विराट भारताचा तिसरा सलामीवीर

मंगळवारपासून (20 सप्टेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेपूर्वी रोहितने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने अनेक मुद्द्यांवर मनमोकळेपणाने भाष्य केले. यादरम्यान त्याने संघाच्या सलामीवीराबद्दल सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आणि सांगितले की, आम्हाला आता आणखी प्रयोग करायचे नाहीत आणि राहुल आमच्यासाठी डावाची सुरुवात करेल. विराटला सलामीला पाठवण्यासाठी प्रशिक्षक राहुल द्रविड (rahul dravid) यांच्याशी बोलणे झाले आहे. या प्रकरणी दोघांचेही एकमत असल्याचे त्याने सांगितले. रोहित म्हणाला की, आशिया चषक स्पर्धेत विराटची कामगिरी पाहून आम्हाला आनंद झाला आहे आणि काही सामन्यांमध्ये आम्ही त्याला सलामीला पाठवू शकतो. (virat kohli and kl rahul indian openers records in t20)

2021 च्या टी 20 विश्वचषकानंतर टीम इंडियाकडून सलामीच्या जोडीत प्रयोग

गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या टी 20 विश्वचषकानंतर टीम इंडियाने सलामीच्या जोडीत बरेच प्रयोग केले. संघ व्यवस्थापनाने यासाठी सुमारे 10 खेळाडूंना आजमावले. पण सरतेशेवटी, अगामी विश्वचषक स्पर्धेसाठी केवळ रोहित (rohit sharma) आणि केएल राहुल हेच सलामी जोडीसाठी योग्य मानले गेले आहेत. आता टी 20 विश्वचषक सुरु होण्यास एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे आणि आता टीम इंडियाच्या सलामीवीरांबाबत काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारताच्या दोन्ही सलामीवीरांच्या (विराट आणि राहुल) विक्रमांवर एक नजर टाकूया. (virat kohli and kl rahul indian openers records in t20)

सलामीवीर म्हणून कोहलीचे रेकॉर्ड उत्कृष्ट (virat kohli)

विराटबद्दल बोलायचे झाले तर तो टी-20 मध्ये एकूण 9 सामन्यांमध्ये सलामी आला आहे. यादरम्यान त्याने 57.14 च्या सरासरीने आणि 161.3 च्या स्ट्राईक रेटने 400 धावा फटकावल्या आहेत. विराटने या काळात दोन अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. त्याने नुकतेच आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध शतकी खेळी साकारली. त्याने 9 सामन्यात 48 चौकार आणि 11 षटकारही मारले आहेत.

राहुलही हिट… (kl rahul)

केएल राहुलच्या (kl rahul) कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर तो एकूण 43 सामन्यात सलामी आला आहे. यामध्ये त्याने 38.1 च्या सरासरीने आणि 138.8 च्या स्ट्राईक रेटने 1524 धावा वसूल केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 16 अर्धशतके झळकली आहेत. त्याने 128 चौकार आणि 64 षटकारही मारले आहेत. विशेष म्हणजे, राहुलने टी 20 मध्ये दोन शतके झळकावली आहेत पण दोघांनी केवळ सलामीलाच नव्हे तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर सुद्धा फलंदाजीला मैदानात उतरले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news