T20 World Cup: रसेल, नरेनला डच्चू देत विंडीजने वर्ल्ड कपसाठी निवडली ‘ही’ टीम | पुढारी

T20 World Cup: रसेल, नरेनला डच्चू देत विंडीजने वर्ल्ड कपसाठी निवडली ‘ही’ टीम

पुढारी ऑनलाईन डेस्क : वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने पुढील महिन्यामध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेसाठी टीमची घोषणी केली आहे. वेस्ट इंडिजने टीम निवडताना दोन दिग्गज फलंदाजांना वगळले आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयाची सोशल मीडियात जाेरदार चर्चा सुरू आहे.

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी 20 विश्वचषकाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंग्लंड या संघांनी या स्पर्धेसाठी आपल्या संघाची घोषणा जाहीर केला आहे. आता दोन वेळा टी २० विश्वचषक विजेत्या वेस्ट इंडिजनेही बुधवारी (१४ सप्टेंबर) आपल्या संघाची घोषणा केली आहे. मात्र, अनेक मोठ्या नावांना या संघात स्थान मिळालेले नाही. तथापि, स्टार सलामीवीर एविन लुईसचे नाव टी 20 विश्वचषक २०२२ साठी निवडलेल्या १५ खेळाडूंमध्ये आहे. २०२१ च्या विश्वचषकानंतर लुईस प्रथमच संघात परतला आहे.

आंद्रे रसेल आणि सुनील नरेन या दोघांना डच्चू (T20 World Cup)

वेस्ट इंडिजच्या बोर्डाने स्टार अष्टपैलू आंद्रे रसेल आणि सुनील नरेनसारख्या खेळाडूंची वर्ल्ड कप संघात निवड केलेली नाही. तोच मुद्दा अनेकांना खटकला आहे. आंद्र रसेल आणि सुनील नरेन दोघांमध्ये एकहाती सामना फिरवायची क्षमता आहे. भारतातील आयपीएल स्पर्धा दोघांनी गाजवली आहे. भारतात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. पण या दोघांनाही संधी मिळालेली नाही.

आंद्रे रसेलला का वगळले?

२०२१ च्या विश्वचषकामध्ये आंद्र रसेलने शेवटचा टी २० सामना खेळला होता. सध्या तो वेस्ट इंडिजच्या सीपीएल २०२२ लीगमध्ये ट्रिनबागो नाइड रायडर्स टीमचे प्रतिनिधीत्व करत आहे. या लीगमध्ये त्याची बॅट तळपताना दिसत नाही. त्याचा सर्वात जास्त स्कोर १७ धावा आहे. या कारणाने रसेलला वेस्ट इंडिजटीममध्ये समावेश केलेला नाही.

१६ ऑक्टोबरपासून स्पर्धेला होणार सुरुवात (T20 World Cup)  

दोन वेळा टी२० चॅम्पियन असलेला वेस्ट इंडिज क्रिकेट संघ अद्याप विश्वचषकासाठी पात्र ठरलेला नाही. हा संघ स्कॉटलंड, झिम्बाब्वे आणि आयर्लंडसह ब गटात आहे. हा संघ १७ ऑक्टोबर रोजी होबार्टच्या मैदानावर स्कॉटलंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यांमध्ये संघाचा निकाल लागल्यानंतरच पुरण अँड कंपनी मुख्य फेरीसाठी पात्र ठरू शकेल.

वेस्ट इंडिज टी२० विश्वचषक संघ : निकोलस पूरन (कर्णधार), रोव्हमन पॉवेल, यानिक कॅरिया, जॉन्सन चार्ल्स, शेल्डन कॉट्रेल, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रॅंडन किंग, एविन लुईस, काइल मेयर्स, ओबेद मॅककॉय, रा. ओडियन स्मिथ

Back to top button