Eng vs Ind 4th test 3rd day: भारताकडे दिवसअखेर १७१ धावांची आघाडी

पुढारी ऑनलाईन डेस्क : Eng vs Ind 4th test 3rd day : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. आज (दि. ४) तिस-या दिवशी भारताने बिनबाद ४३ धावसंख्येच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. भारताने तिसरा दिवसअखेर ३ बाद २७० धावांपर्यंत माजल मारली. भारताकडे आता १७१ धावांची आघाडी आहे.
भारताकडून सलामीवीर रोहित शर्माने तिसऱ्या दिवशी दमदार फलंदाजी करत शतक ( १२७ ) ठोकले. त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या चेतेश्वर पुजाराने ६१ धावांची खेळी करत चांगली साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १५३ धावांची दमदार भागीदारी रचली. अखेर ऑली रॉबिन्सनने रोहित आणि चेतेश्वर पुजाराला एकाच षटकात बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर विराट कोहली आणि रविंद्र जडेजाने भारताला २७० धावांपर्यंत पोहचवले. अंधुक प्रकाशामुळे दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी विराट २२ तर जडेजा ९ धावा करुन नाबाद होते.
सलग दोन विकेट…
८१ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रोहित बाद झाला. नवीन चेंडू घेतल्यानंतर इंग्लंड संघाला दुसरे यश मिळाले. रॉबिन्सनच्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करताना रोहित शर्माचा ख्रिस वोक्सने झेल पकडला केले. रोहितने त्याच्या १२७ धावांच्या खेळीत १४ चौकार आणि १ षटकार ठोकला. त्याने २५६ चेंडूंचा सामना केला. रोहित आणि पुजाराने दुस-या विकेटसाठी १५३ धावांची भागीदारी केली.
रोहित बाद झाल्यानंतर त्याच सटकाच्या शेवटच्या सहाव्या चेंडूवर चेतेश्वर पुजारा बाद झाला. रॉबिन्सनच्या गोलंजाजीवर मोईनने पुजाराचा झेल पकडला. पुजाराने ६७ (१२७) धावा केल्या. या खेळीत त्याने ९ चौकार लगावले.
That’s a 150-run partnership between @ImRo45 & @cheteshwar1 🙌🙌
Live – https://t.co/OOZebPnBZU #ENGvIND pic.twitter.com/mEh551Cgi7
— BCCI (@BCCI) September 4, 2021
पुजाराचे अर्धशतक…
७१ व्या षटकाच्या दुस-या चेंडूवर चौकार लगावून चेतेश्वर पुजाराने अर्धशतक पूर्ण केले. क्रेग ओव्हरटन हे षटक फेकत होता. पुजाराचे हे ३१ वे अर्धशतक आहे.
भारताची १०० धावांची आघाडी…
चहापानापर्यंत भारताची धावसंख्या १ बाद १९९ होती. टीम इंडियाने इंग्लंडवर १०० धावांची आघाडी घेतली आहे.
That will be Tea on Day 3 of the 4th Test.
Wicketless session for #TeamIndia as Rohit Sharma and Cheteshwar Pujara stitch a fine 116*- run partnership between them.
Scorecard – https://t.co/OOZebPnBZU #ENGvIND pic.twitter.com/0ooQleMXRK
— BCCI (@BCCI) September 4, 2021
रोहितने षटकार ठोकून पूर्ण केले शतक!
टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा ओव्हल कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात पूर्ण रंगात दिसला. त्याने इंग्लिश गोलंदाजी आक्रमणाचा जोरदार सामना करताना शतक ठोकले. रोहित शर्माने परदेशी भूमीवर प्रथमच शतक झळकावण्याचा पराक्रम केला. त्याने हे यश त्याच्या ४३ व्या कसोटी सामन्यात मिळवले. त्याने इंग्लंडचा गोलंदाज मोईन अलीला षटकार ठोकून आपले कसोटी शतक पूर्ण केले. कसोटी कारकिर्दीतील हे त्याचे ८ वे शतक आहे. त्याने कसोटीत आपल्या ३ हजार धावाही पूर्ण केल्या.
रोहितने २०४ चेंडूंचा सामना करत १२ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. इंग्लंडविरुद्ध त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे शतक ठरले. याच वर्षी चेन्नईमध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने पहिले कसोटी शतक झळकावले आणि १६१ धावा केल्या.
💯 for HITMAN
First away Test ton for @ImRo45 👏👏
He also breaches the 3K Test-run mark.#TeamIndia #ENGvIND pic.twitter.com/KOxvtHQFGB
— BCCI (@BCCI) September 4, 2021
इंग्लंडच्या भूमीवर कसोटी सलामीवीर म्हणून त्याचे हे पहिले कसोटी शतक आहे. या शतकी खेळीदरम्यान त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यांत २००० धावा पूर्ण केल्या. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शतक झळकावणारा रोहित दुसरा फलंदाज ठरला. त्याच्या आधी केएल राहुलने इंग्लंडविरुद्ध या कसोटी मालिकेत शतक झळकावले होते.
रोहित शर्मा-चेतेश्वर पुजाराची शतकी भागिदारी…
६३ व्या षटकात रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी १०० धावांची भागिदारी पूर्ण केली.
A CENTURY stand comes up between @ImRo45 & @cheteshwar1 👏👏
How good has this duo been for #TeamIndia
Live – https://t.co/OOZebPnBZU #ENGvIND pic.twitter.com/GMqUzK2SjS
— BCCI (@BCCI) September 4, 2021
रोहित शर्मा-चेतेश्वर पुजाराची अर्धशतकी भागिदारी…
दुखापत असूनही चेतेश्वर पुजाराच्या फलंदाजी शैलीमध्ये कसलाही बदल झालेला नाही. ४९ व्या षटकात चेतेश्वरने ओव्हरटनला दोन चौकार मारून रोहितसोबत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली.
A fine 50-run partnership comes up between @ImRo45 & @cheteshwar1.
Keep going, boys 💪
Live – https://t.co/OOZebPnBZU #ENGvIND pic.twitter.com/lYMecGxwKh
— BCCI (@BCCI) September 4, 2021
रोहित शर्माचे अर्धशतक….
लंचनंतर पुढील खेळास सुरुवात झाली. ४७ व्या षटकात रोहित शर्माने ओव्हरटनच्या तिसऱ्या चेंडूवर दोन धावा काढून अर्धशतक झळकावले. त्याने १४५ चेंडूंचा सामना केला. या खेळीत त्याने ५ चौकार लगावले. दरम्यान, रोहितने पहिल्यांदाच एका कसोटी मालिकेत खेळताना ७०० हून अधिक चेंडूंचा सामना केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील त्याने या आधी दोन अर्धशतके झळकावली आहेत.
🅵🅸🅵🆃🆈!
Hitman @ImRo45 brings up his 3rd half-century of the series! He also crosses 1k runs in international cricket in 2021.🙌🏾#TeamIndia #ENGvIND
Scorecard – https://t.co/OOZebPnBZU pic.twitter.com/uwEjdSnX7H
— BCCI (@BCCI) September 4, 2021
केएल राहुल बाद झाल्यानंतर तिस-या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या चेतेश्वर पुजाराने रोहित शर्माच्या साथीने टीम इंडियाची धावसंख्या हलती ठेवली. यामुळे यजमान संघावरील धावांच्या आघाडीत हळूहळू वाढ होत आहे.
४५ व्या षटकात पुजाराने क्रेग ओव्हरटनच्या गोलंदाजीवर पॉईंटच्या दिशेने चौकार मारला. यादरम्यान धाव घेताना पुजाराच्या पायातील स्नायू दुखावला. त्यानंतर भारतीय संघाचे फिजिओ मैदानावर आले. त्यांनी पुजाराला वैद्यकीय सेवा दिली. यावेळी सामना काही काळासाठी थांबवण्यात आला होता.
Cheteshwar Pujara rolls his ankle over.
After receiving treatment, he is back on his feet and continues to bat💪💪#ENGvIND pic.twitter.com/yLsam8DpRu
— BCCI (@BCCI) September 4, 2021
तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्राच्या अखेरीस भारताची धावसंख्या १ बाद १०८ होती. रोहित शर्मा ४७ आणि चेतेश्वर पुजारा १४ धावांवर नाबाद खेळत होते. त्यावेळी भारताने यजमान इंग्लंडवर ९ धावांची आघाडी घेतली होती.
केएल राहुल बाद…
३६ व्या षटकात भारताला ८३ धावसंख्येवर पहिला धक्का बसला. षटकाच्या पाचव्या चेंडूवर, जेम्स अँडरसनने रोहित-राहुल जोडी फोडली. त्याने केएल राहुलला यष्टीरक्षक बेअरस्टो करवी झेलबाद केले. राहुलने १०१ चेंडूत ६ चौकार १ षटकाराच्या मदतीने ४६ धावा केल्या. त्याचे अर्धशतक अवघ्या चार धावांनी हुकले.
केएल राहुला DRS ने वाचवले…
२४ व्या षटकात राहुलने वोक्सच्या तिसऱ्या चेंडूवर पुल शॉटच्या जोरावर षटकार ठोकला. पुढच्या चेंडूवर राहुल वोक्सने चकवत पायचीतचे जोरदार अपील केले. मैदानी पंचांनीही त्याला बाद घोषीत केले. पण सहकारी फलंदाज रोहितशी चर्चा केल्यानंतर राहुलने डीआरएसची मदत घेतली. त्यानंतर रिह्यू पाहून तिस-या पंचांनी त्याला नाबाद घोषीत केले. यावेळी भारताची धावसंख्या ७१ होती.
रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून ११ हजार धावा पूर्ण केल्या.
11000 international runs and counting as an opener for @ImRo45 👏#TeamIndia pic.twitter.com/35r2rz2jjm
— BCCI (@BCCI) September 4, 2021
१९ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रोहित शर्माने एक धाव काढून संघाचे अर्धशतक धावफलकावर झळकावले. याचबरोबर रोहित-राहुल जोडीची ५० धावांची भागिदारी पूर्ण झाली.
दरम्यान, दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारताने दुसऱ्या डावात विकेट न गमावता रोहित शर्मा आणि केएल राहुल या सलामी जोडीच्या जोरावर ४३ धावा केल्या.
दरम्यान, दुसर्या दिवशी इंग्लंडने पहिल्या डावात २९० धावा केल्या. त्यांना पहिल्या डावात ९९ धावांची आघाडी मिळाली. घरच्या मैदानावर खेळणारा ओली पोपे (८१) आणि पुनरागमन करणारा ख्रिस वोक्स (५०) यांनी अर्धशतकी खेळी केल्यामुळे इंग्लंडला तीनशे धावांच्या जवळ पोहोचता आले.
त्यानंतर भारताच्या रोहित शर्मा (२०) आणि के. एल. राहुल (२२) यांनी उरलेला दिवस खेळून काढीत बिनबाद ४३ धावा केल्या.
भारतीय संघाने चौथ्या कसोटीच्या दुसर्या दिवशी शुक्रवारी सकाळी दमदार सुरुवात केली. उमेश यादवने ओव्हरटर्नला (१) बाद करीत भारताला चौथे यश मिळवून दिले. डेव्हिड मलानलाही उमेश यादवने बाद करीत इंग्लंडला पाचवा हादरा दिला. त्यामुळे गुरुवारी नाबाद असलेली जोडी सकाळी ९ धावांत तंबूत परतली. भारतासाठी ही चांगली सुरुवात होती. परंतु, त्याचा फायदा मात्र त्यांना घेता आला नाही.
ओली पोपे आणि जॉनी बेअरस्टो या दोघांनी संघाची पडझड उपहारापर्यंत थांबवली. या दोघांची शतकाकडे वाटचाल करीत असलेली भागीदारी मोहम्मद सिराजने मोडली. त्याने जॉनी बेअरस्टोला (३७) पायचित केले. यानंतर पोपेच्या साथीला मोईन अली आला. दरम्यान, पोपेने ९२ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले.
६२व्या षटकात इंग्लंडने भारताची पहिल्या डावातील धावसंख्या ओलांडली. पोपेने मोईन अलीसोबतही अर्धशतकी भागीदारी उभारली. नवा चेंडू घेतल्यानंतर अली बाद झाला. फिरकीपटू रवींद्र जडेजाने त्याला ३५ धावांवर रोहितकरवी झेलबाद केले. चहापानानंतर शतकाच्या जवळ पोहोचलेल्या ओली पोपेला शार्दुलने बाद केले. त्याने पोपेची ८१ धावांवर दांडी गुल केली.
पोपेने आपल्या खेळीत ६ चौकार ठोकले. पोपेनंतर इंग्लंडचा डाव लवकर आटोपणार असे वाटत होते; पण ख्रिस वोक्सने झुंजार खेळी करीत इंग्लंडची आघाडी वाढवली. वोक्सने ११ चौकारांसह अर्धशतकी खेळी केली. ५० धावांवर तो धावचित झाल्यामुळे २९० धावांवर इंग्लंडचा डाव संपुष्टात आला. भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक तीन बळी घेतले, तर बुमराह आणि जडेजाने दोन-दोन बळी घेतले.
तत्पूर्वी, भारतीय फलंदाजांचे ‘ये रे माझ्या मागल्या…’ असे रडगाणे चौथ्या कसोटीतही दिसून आले. भारताचा पहिला डाव अवघ्या १९१ धावांमध्ये गुंडाळला. शार्दुल ठाकूरने केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळे भारताला किमान सन्मानजनक धावसंख्या तरी उभारता आली. त्यानंतर भारताने इंग्लंडचे तीन फलंदाज ५३ धावांत तंबूत पाठवले होते. उमेश यादवने ज्यो रूटचा त्रिफळा उडवून भारतासाठी मोठा दिलासा दिला होता.