Asia 2022 : श्रीलंकेने ४ गडी राखून अफगानिस्तानचा काढला वचपा

Asia 2022 : श्रीलंकेने ४ गडी राखून अफगानिस्तानचा काढला वचपा

शारजाह; पुढारी ऑनलाईन : आशिया चषकातील (Asia 2022) पहिल्या सुपर ४ मधील सामन्यात श्रीलंकेने अफगानिस्तानला ४ गडी राखून पराभूत करत साखळी सामन्यातील पराभवाचा वचपा काढला. अफगाणिस्तानने ठेवलेल्या १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेने ६ गडी गमावत २० व्या षटकातील पहिल्या चेंडूवर आवश्यक १७९ धावा करत सामना जिंकला. श्रीलंकेने पथुम निसंका, कुसल मेंडिस, दनुष्का गुणथिलका आणि भानुका राजपाक्षे यांच्या फंलदाजीच्या जोरावर हा महत्त्वपूर्ण सामना सहज खिशात घातला.

अफगाणिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकाच्या सलामीजोडीने चांगली सुरुवात दिली. त्यांनी सुरुवातीपासून अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना प्रभावी ठरु दिले नाही. सहाव्या षटकात श्रीलंकेने ५० धावा फलकावर लावल्या. सातव्या षटकात गोलंदाज नवी उल हक याने कुशल मेंडिस याला बाद केले. मेंडिसने १९ चेंडूत ३६ धावा केल्या. या खेळीत त्याने ३ षटकार व २ चौकार लगावले. यानंतर पथुम निसंकाने चरिथ असलंकाला सोबत घेऊन धावा जोडण्यास सुरु केल्या. ही जोडी थोडी स्थिर होत होती तेव्हा गोलंदाज मुजीबने निसांकाला बाद केले. निसांकाने २८ चेंडूत ३५ धावा केल्या. त्याने ३ चौकार आणि १ षटकार लगावला. निसांका पाठोपाठ चरिथ असलंका ८ धावांवर बाद झाला. (Asia 2022)

यांनतर धनुष्का गुणथिलका आणि कर्णधार दासुन शनाका यांनी काही धावा जोडल्या. मोठा फटका खेळण्याच्या नादात दासुन शनाका मुजीबच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने १० धावा केल्या. थोडासा स्थिरावलेला धनुष्का गुणथिलकाला राशिद खानने बोल्ड केले. त्याने २० चेंडूत ३३ धावांची खेळी केली. यानंतर भानुका राजेपाक्षे आणि वनिंदु हसरंगा यांनी अखेरच्या षटकांमध्ये धावा जोडल्या आणि श्रीलंकेचा विजय दृष्टीपथात आणला. अखेर विजयासाठी एका धावेची आवश्यकता असताना राजेपाक्षे बोल्ड झाला. त्याने १४ चेंडूत ३१ धावा केल्या. हसरंगा हा १६ तर चमिका करुणारत्ने हा ५ धावांवर नाबाद राहिले. अशा पद्धतीने श्रीलंकेने २० व्या षटकातील पहिल्या चेंडूवर ६ गडी गमावत १७९ धावा केल्या. या पराभवानंतर अफगाणिस्तानवरील दबाव वाढलेला असेल, कारण त्यांना भारत आणि पाकिस्तान या अतिशय बलाढ्य संघांशी भिडावे लागणार आहे. तर श्रीलंकेने अफगाणिस्तानला पराभव करत सुपर ४ मध्ये आघाडी घेतली आहे.

अफगाणिस्तान संघ : हजरतुल्ला झजाई, रहमानुल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम जारदान, मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्ला जारदान, करीम जनात, समिउल्ला शिनवारी, रशीद खान, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान, फझलहक फारुकी

श्रीलंका : पथुम निसंका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), चरिथ असलंका, दनुष्का गुणथिलका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (कर्णधार), वनिन्दु हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थिक्क्षना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news