Asia Cup 2022 : पाकिस्तानला पुन्हा झटका देण्यासाठी भारताचा सिक्रेट प्लॅन तयार | पुढारी

Asia Cup 2022 : पाकिस्तानला पुन्हा झटका देण्यासाठी भारताचा सिक्रेट प्लॅन तयार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया कप 2022 (Asia Cup 2020) मध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) संघ पुन्हा एकदा रविवारी (दि.४) आमनेसामने येणार आहेत. शुक्रवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने हाँगकाँगचा १५५ धावांनी पराभव केला आणि या सोबतच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आणखी एक सामनाही निश्चित झाला. कारण हाँगकाँगला पराभूत करून अ गटात भारतापाठोपाठ पाकिस्ताननेही सुपर-4 मध्ये स्थान मिळवले आहे.

पाकिस्तानपूर्वी भारत, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या संघांनी अंतिम- 4 मध्ये स्थान मिळवले आहे. आता रविवारी पुन्हा एकदा आशिया चषकात (Asia Cup 2020) उत्साहाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. कारण पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येणार आहेत. भारतीय संघाने आधीच पाकिस्तानचा पराभव करून T20 विश्वचषक 2021 मधील पराभवाचा बदला घेतला आहे, आता पुन्हा एकदा रोहित अँड कंपनी पाकिस्तानला चकित करण्यासाठी सज्ज झाली आहे.

रोहित – विराटची खास तयारी (Asia Cup 2020)

बीसीसीआयने (BCCI) रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ब्लॉगबस्टर सामन्यापूर्वी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर काही छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यामध्ये रोहित शर्मा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी काही संभाषण करताना दिसत आहे, तर विराट कोहली नेटमध्ये घाम गाळताना दिसत आहे. याशिवाय संघाचे 360 डिग्री खेळाडू म्हणजेच सूर्यकुमार यादव आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हे देखील जोरदार सराव करत आहेत.

Asia Cup 2020

भारतीय संघाची तयारी पाहता पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी संघ पूर्णपणे सज्ज असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. यापूर्वी, आशिया कप 2022 मध्ये खेळल्या गेलेल्या त्यांच्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला होता.

Asia Cup 2020

रविवारी खेळल्या जाणाऱ्या सामन्यात पाकिस्तान संघालाही भारताकडून त्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे. हार्दिक पांड्याशिवाय रवींद्र जडेजानेही भारताला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र आशिया चषक स्पर्धेच्या मध्यंतरात भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे कारण जडेजा दुखापतीमुळे स्पर्धेतील आगामी सामन्यांमधून बाहेर पडला आहे. आता जडेजाच्या जागी अक्षर पटेलचा समावेश करण्यात आला आहे.

Back to top button