T20 World Cup : टी २० विश्वचषकासाठी इंग्लंड संघाची घोषणा | पुढारी

T20 World Cup : टी २० विश्वचषकासाठी इंग्लंड संघाची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाच्या वर्षाअखेर होणाऱ्या क्रिकेटच्या सर्वात मोठ्या महोत्सवासाठी अर्थात टी २० वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) इंग्लंडच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. शुक्रवारी, (दि. २) इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB)वर्ल्ड कपच्या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. यष्टीरक्षक तथा स्फोटक फलंदाज जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ या क्रिकेटच्या सर्वात मोठ्या इव्हेंटमध्ये इतर बलाढ्य संघांना भिडण्यासाठी सज्ज झाला आहे.

गोलंदाज मार्क वुड आणि अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्स यांनी झालेल्या दुखापतीतून पुनरागमन करत टी २० संघात स्थान पटकावले आहे. अशा प्रकारे काही खेळाडुंची घरवापसी झाली आहे, तर काही स्पोटक फलंदाज ज्याना काही काळापासून धावा करता आल्या नाहीत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या बदलांशिवाय बाकीचा संघ अपेक्षेप्रमाणे जसाचा तसा आहे. (T20 World Cup)

मोठ्या बदलांतर्गत इंग्लिश सलामीवीर जेसन रॉयला संघातून वगळण्यात आले आहे. अलीकडच्या काळात, जेसन रॉयची बॅट बराच काळ शांत राहिली आहे आणि व्यवस्थापनाला त्याच्या कडून धावांची अपेक्षा होती. यामुळेच जेसन रॉयला संघात स्थान देण्यात आले नाही. इंग्लंडच्या बोर्डने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रकात असे म्हटले आहे की वोक्स आणि वुड यांनी इंग्लंडकडून शेवटचा सामना विंडीजविरुद्धच्या कसोटी दौऱ्यात खेळला होता. (T20 World Cup)

इंग्लंडचा विश्वचषक संघ : (T20 World Cup)

1. जोस बटलर (कर्णधार) 2. मोईन अली 3. जॉनी बेअरस्टो 4. हॅरी ब्रूक 5. सॅम करन 6. ख्रिस जॉर्डन 7. लियाम लिव्हिंगस्टोन 8. ड्वेन मलान 9. आदिल रशीद 10. फिल सॉल्ट 11. बेन स्टोक्स 12. रीस टॉपल 13. डेव्हिड विली 14. ख्रिस वोक्स 15. मार्क वुड

वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचा पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध 22 ऑक्टोबरला पर्थमध्ये होणार आहे, त्यानंतर 28 ऑक्टोबरला त्यांचा सामना ऑस्ट्रेलिया आणि 1 नोव्हेंबरला ते न्यूझीलंडशी भिडणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल.

Back to top button