Suryakumar Yadav : पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नावर सूर्यकुमार यादवने हसून लोटपोट होत दिले उत्तर

Suryakumar Yadav : पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नावर सूर्यकुमार यादवने हसून लोटपोट होत दिले उत्तर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बुधवारी (दि.31ऑगस्ट) हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचे स्टार क्रिकेटपटू केएल राहुल आणि विराट कोहली (Virat kohli) मोठे फटके खेळताना धडपडताना दिसले. विशेषतः राहुलने (KL Rahul) दुबईत खेळल्या गेलेल्या आशिया चषकातील (Asia Cup 2022) T20 सामन्यात (IND vs HK) अतिशय संथ फलंदाजी केली. राहुलने 39 चेंडूत केवळ 36 धावा केल्या. राहुलचा स्ट्राईक रेट 92.31 होता. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) क्रीजवर येताच रनरेटने वेगळीच झेप होती. या तरुण उजव्या हाताच्या फलंदाजाने 26 चेंडूत नाबाद 68 धावांची खेळी केली, ज्यात त्याने 6 चौकार आणि तब्बल 6 षटकार लगावले. सूर्याने २६१.५४ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली.

सुर्यकुमारच्या खेळीच्या जोरावर भारताने दोन गडी गमावून १९२ धावा केल्या. सूर्या आणि विराटने शेवटच्या तीन षटकात 52 धावा जोडल्या. सूर्यकुमारने डावाच्या शेवटच्या षटकात चार षटकार ठोकले. त्याची अशी फलंदाजी पाहून दुसऱ्या टोकाला उभा असलेला विराट कोहलीही आवाक झाला व खेळ संपताच त्याला अभिवादन केले.

या स्फोटक खेळीसाठी सूर्यकुमार यादवला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरवण्यात आले. आशिया चषकाच्या या शानदार सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमारने आपली खेळी आणि भारताच्या विजयाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

रोहित शर्मासोबत ओपनिंग कराल ?

दरम्यान, पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नावर आधी सूर्यकुमार खूप हसला. पत्रकाराने विचारले, "रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला, की तुम्ही लोक या संपूर्ण आशिया कपमध्ये प्रयोग कराल. त्या प्रयोगाचा एक भाग असाही असेल की तुम्ही कधीतरी रोहित शर्मासोबत ओपनिंग कराल?

पाकिस्तानी पत्रकाराच्या या प्रश्नावर सुर्यकुमारने हसून उत्तर दिले, "म्हणजे तुम्ही म्हणताय की केएल राहुल खेळायला द्यायला नको ? बघा, तोही दुखापतीतून परत येत आहे. त्याला थोडा वेळ हवा आहे.

फक्त मला खेळवा : सूर्यकुमार

पुढे सूर्यकुमार म्हणाला, मी कोणत्याही नंबरवर खेळण्यासाठी तयार आहे. प्रशिक्षक व कर्णधारला सांगितले आहे, मला कोणत्याही क्रमांकावर पाठवा पण, फक्त मला खेळवा. शिवाय काही प्रयोग असेच चालत राहतील. आम्हाला नवीन गोष्टी करायच्या आहेत आणि त्यासाठी आम्ही चांगले प्रयत्न करत आहोत. सराव सत्रांसोबतच अशा गोष्टी चालू सामन्यात केल्या तर त्या गोष्टींचा नेमका अंदाज येतो व कल्पनाही येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news