Shubman Gill Dating Sara Ali Khan : शुभमन गिल सारा तेंडूलकरच्या नव्हे तर सारा अली खानच्या मागे

Shubman Gill Dating Sara Ali Khan : शुभमन गिल सारा तेंडूलकरच्या नव्हे तर सारा अली खानच्या मागे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिलचे (Shubman Gill) नाव महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत (Sara Tendulkar) बऱ्याच काळापासून जोडले जात आहे. दरम्यान, या युवा सलामीवीराचा एक फोटो व व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका मुलीसोबत डिनर डेट करताना दिसत आहे. त्या मुलीचे नावही सारा आहे, पण ती सचिनची मुलगी सारा नसून बॉलिवूड स्टार्स सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान (Sara Ali Khan) आहे. (Shubman Gill Dating Sara Ali Khan)

व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि फोटो बाबत ते कोणत्या ठिकाणी भेटले याबाबत संभ्रम आहे. काहींच्या मते शुभमन गिल व सारा अली खान हे दुबईमध्ये (Shubman Gill Dating Sara Ali Khan) तर काहींच्या मतानुसार ते लंडनमध्ये भेटले असावेत असे सांगितले जात आहे. फोटोमध्ये दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये डिनर करताना दिसत आहेत. मात्र, सध्या टीम इंडिया यूएईमध्ये आशिया कप 2022 खेळत आहे. पण, शुभमन गील मात्र या संघाचा भाग नाही. वृत्तांवर विश्वास ठेवला तर तो इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळताना दिसू शकतो.

इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमधील चमकदार कामगिरीनंतर शुभमन गिलने झिम्बाब्वेमध्ये जबरदस्त कामगिरी बजावली त्याने एकदिवसीय कारकिर्दीतील शतकही झळकावले. यादरम्यान मीडियामध्ये बातम्या आल्या की शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. तथापि, येथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे सारा आणि शुभमन एकत्र दिसले नाहीत किंवा त्यांनी या रिपोर्ट्सवर कधीही कोणतेही वक्तव्य केले नाही. (Shubman Gill Dating Sara Ali Khan)

महत्त्वाची बाब अशी की, इंडियन प्रीमियर लीग 2019 दरम्यान पहिल्यांदाच सारा तेंडूलकर आणि गिल यांच्या अफेअरच्या बातम्यांनी जोर पकडला होता. गिल जे काही करायचे ते साराशी जोडले जाऊ लागले. दुसरीकडे, सारा अली खान एक यशस्वी अभिनेत्री बनली आहे. तिचे वडील सैफ अली खान हे बॉलिवूडचे मोठे स्टार आहेत, तर आई अमृता सिंग याही प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news