

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री मौनी रॉय ( Mouni Roy ) नेहमी सोशल मीडियावर तिचे हॉट फोटो शेअर करून चाहत्यांच्यात सक्रिय राहत असते. सध्या ती पुन्हा नव्याने एथनिक लूकमुळे चर्चेत आली आहे. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयने ( Mouni Roy ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर एथनिक लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने व्हाईट रंगाच्या साडीसोबत मॅचिंग सिव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे. मोकळ्या केसांची स्टाईल, स्मोकी मेकअप, गळ्यातील हार, हातातील अंगठी आणि लिपस्टिकने तिच्या सौदर्यांत भर घातली आहे. फोटोला तिने किलर पोझ दिली असून यात ती खूपच हॉट, ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने हार्ट ईमोजी शेअर केला आहे. हा फोटो चाहत्याच्या पसंतील उतरला आहे.
'Stunning ?❤️!!, ?Cool', 'Killer Babyy❤️❤️', 'Nice look, White queen ? ✨️ ? 1??', 'Beautifully captured shot ❤️❤️', 'You are so pretty?', 'Ohh my God ?', 'Excellent ❤️❤️', 'Gorgeous ??', 'Pretty ❤️', 'beautiful ❤️❤️', 'Cutie ?', 'White blast??', 'Gorgeous Beauty ?'. यासारख्या अनेक कमेन्टस करत चाहत्यांनी तिचे भरभरून कौतुक केले आहे. यासोबत काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला आतापर्यत २ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास मौनी रॉय बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे. मौनीने तिच्या करिअरची सुरुवात टीव्हीच्या दुनियेतून केली होती. याशिवाय मौनी अनेक टीव्ही शो, रिअॅलिटी शो, म्युझिक व्हिडिओ दिसली आहे. या सगळ्यासोबत ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
हेही वाचलंत का?