IND vs AFG : भारताचे अफगाणिस्तान समोर 213 धावांचे आव्हान, विराट कोहलीचे अडीच वर्षांनी शतक

IND vs AFG : भारताचे अफगाणिस्तान समोर 213 धावांचे आव्हान, विराट कोहलीचे अडीच वर्षांनी शतक
Published on
Updated on

पुढारी ऑनलईन डेस्क : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील आशिया चषक स्पर्धेच्या सुपर 4 फेरीतील सामना आज खेळवला जात आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करत 20 षटकांत 2 बाद 212 धावा केल्या. टीम इंडियासाठी विराट कोहलीने 61 चेंडूत नाबाद 122 धावांची खेळी केली. तर केएल राहुलने 41 चेंडूत 62 धावांची खेळी केली. ऋषभ पंत 16 चेंडूत 20 धावा करून नाबाद राहिला. सूर्यकुमार यादवने सहा धावा केल्या.

या सामन्यात टीम इंडियामध्ये तीन बदल करणात आले आहेत. रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि युझवेंद्र चहल हे प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहेत. त्यांच्या जागी त्याच्या जागी दीपक चहर, दिनेश कार्तिक आणि अक्षर पटेल यांचा संघात सहभाग केला आहे. रोहितच्या गैरहजेरीत केएल राहुल संघाचे नेतृत्व करत आहे.

कोहलीचे शतक

विराट कोहलीने आज वादळी खेळीचे प्रदर्शन केले. त्याने 33 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक केले. त्याने 19व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार मारून आपले शतक पूर्ण केले. 53 चेंडूत त्याने शतक पूर्ण केले. हे त्याचे टी-20 मधील पहिले शतक आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे 71 वे शतक आहे. विराटने नोव्हेंबर 2019 मध्ये कोलकाता येथे दिवस-रात्र कसोटीत बांगलादेशविरुद्ध शेवटचे शतक झळकावले होते.

राहुल आणि सूर्यकुमार यादव बाद

13 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर भारताला पहिला धक्का बसला. केएल राहुल 41 चेंडूत 62 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि दोन षटकार मारले. फरीदने राहुलला नजीबुल्लाहवी झेलबाद केले. राहुलनंतर सूर्यकुमार यादवही बाद झाला आहे. सूर्यकुमारने पहिल्या चेंडूवर षटकार मारला आणि दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. त्यालाही फरीदने बाद केले.

कोहलीचे अर्धशतक

विराट कोहलीने या आशिया कपमध्ये तिसरे अर्धशतक पूर्ण केले आहे. तसेच टीम इंडियानेही 100 धावा पूर्ण केल्या. राहुल आणि कोहली यांच्यात शतकी भागीदारी झाली आहे. राहुलनेही या आशिया कपमध्ये पहिले अर्धशतक पूर्ण केले.

भारताचा संघ :

केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, दीपक हुडा, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, दीपक चहर, आर अश्विन

अफगाणिस्तानचा संघ :

हजरतुल्ला झाझाई, रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, करीम जनात, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, अजमतुल्ला ओमरझाई, रशीद खान, माजीब उर रहमान, फरीद अहमद, फझलहक फारुकी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news