जेम्स अँडरसन ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच गोलंदाज

जेम्स अँडरसन ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच गोलंदाज
Published on
Updated on

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंग्लंडने जिंकला. पहिल्या डावात जेम्स अँडरसन भारताचा कर्दनकाळ बनून आला. त्याने कधी नव्हे ते नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताच्या टॉप ऑर्डरला मोठे भगदाड पाडले. त्याने पहिल्या डावात ४ विकेट घेत भारताचा डाव फक्त ७८ धावात संपवण्यास मदत केली.

जेम्स अँडरसनला दुसोऱ्या डावात फारशा विकेट घेता आल्या नसल्या तरी त्याने प्रभावी मारा केला. त्याने दुसऱ्या डावात फक्त एक विकेट घेतली. त्याने भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला १० धावांवर बाद केले. मात्र दुसऱ्या डावातील ही एकमेव विकेट जेम्स अँडरसनसाठी इतिहास घडवणारी ठरली.

त्याने रहाणेला बाद करत इंग्लंडमध्ये खेळताना आपल्या ४०० विकेट पूर्ण केल्या. आता जेम्स अँडरसन इंग्लंडमध्ये ४०० विकेट घेणार पहिला गोलंदाज ठरला आहे. याचबरोबर त्याने इंग्लंडमध्ये ३०० आणि ४०० विकेट घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला.

 मात्र 'या' बाबती मुरलीधरनच अव्वल

पण, आपल्या मायदेशात सर्वाधिक विकेट घेणाच्या बाबतीत जेम्स अँडरसन अजूनही मुथय्या मुरलीधरनच्या मागेच आहे. मुथय्या मुरलीधरनने मायदेशात खेळताना ४९३ विकेट घेतल्या आहेत. याचबरोबर भारताच्या अनिल कुंबळे यांनीही कसोटीत भारतात ३५० विकेट घेतल्या आहेत. तर इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने मायदेशात ३४१ विकेट घेतल्या आहेत.

अँडरसन इंग्लंडमध्ये ३०० पेक्षा जास्त विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला होता. यापूर्वी फ्रेड ट्रुमॅन यांनी २९९ विकेट घेतल्या होत्या. आता ते तिसऱ्या स्थानावर आहे. अँडरसनने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत दमदार गोलंदाजी केली आहे. त्याने आतापर्यंत या मालिकेत १३ विकेट घेतल्या आहे. यंदाच्या वर्षात त्याने आतापर्यंत ३० विकेट घेतल्या आहेत. यात दोनवेळा त्याने ५ विकेट घेण्याचा कारनामा केला आहे.

भारताला लीड्स कसोटीत पराभव पहावा लागला आहे. इंग्लंडने भारताचा एक डाव आणि ७६ धावांनी पराभव केला. भारताचा दुसरा डाव २७८ धावात संपुष्टात आला. भारताकडून पुजाराने झुंजार फलंदाजी करत ९१ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली.

इंग्लंडकडून पहिल्या डावात २ तर दुसऱ्या डावात ५ विकेट घेणाऱ्या ऑली रॉबिन्सनला समनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news