बॉक्सिंग : निखत झरिनची सुवर्णपदकाकडे घोडदौड | पुढारी

बॉक्सिंग : निखत झरिनची सुवर्णपदकाकडे घोडदौड

जागतिक चॅम्पियन निखत झरिन व टोकिओ ऑलिम्पिक ब्राँझपदक विजेत्या लोवलीना बागेहिन यांनी आपापल्या सामन्यांत विजय मिळवून येथे चालू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील बॉक्सिंग यातील महिला गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. निखतने 50 किलो वजनी गटाच्या सामन्यात मोझांबिकच्या हेलेना ईस्माईल बागाओला पराभूत केले; तर लोवलीनाने 70 किलो वजनी गटाच्या लढतीत एरियाना निकोल्सचा 5-0 असा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.

भारताच्या शिवा थापाला मात्र 63.5 किलो वजनी गटाच्या अंतिम 16 फेरीच्या सामन्यात स्कॉटलंडच्या रीस लिंचकडून 1-4 असा पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे त्याचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तसेच 92 किलोंच्या हेवीवेट गटात बॉक्सर संजीतचेही सोमोआच्या आटो लिओ प्लॉडझिकीकडून पराभूत झाल्यामुळे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

बॉक्सिंग : 57 किलो पुरुष वजनी गटात हुसामुद्दीन उपांत्यपूर्व फेरीत

भारताचा 57 किलो वजनी गटात खेळणारा बॉक्सर मोहम्मद हुसामुद्दीनने मोहम्मद सलिम हुसैनचा 5-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. याचबरोबर 51 किलो वजनी गटात अमित पांघलने विजयी सुरुवात केली.

Back to top button