IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानवर ८ गडी राखून विजय; सेमीफायनलचा मार्ग सुकर | पुढारी

IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानवर ८ गडी राखून विजय; सेमीफायनलचा मार्ग सुकर

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने आज पाकिस्तान विरुद्‍ध दणदणीत विजय मिळवला. या कामगिरीमुळे भारताचा सेमीफायनलचा मार्ग सुकर झाला आहे. (IND W vs PAK W)

भारतीय गाेलंदाजांचा भेदक मारा

सामन्याच्या सुरूवातीपासूनच भारताच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानी संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. भारताच्या मेघना सिंगने  पाकिस्तानची सलामीवीर फलंदाज इरम जावेद हिला 0 (3) धावांवर बाद करत तंबूचा रस्ता दाखवला. यावेळी मेघना सिंगने यास्तिका भाटिया करवी इरमला झेलबाद केले.(IND W vs PAK W)

भारताची गोलंदाज स्नेह राणाने पाकिस्तानच्या मुनीबा अली आणि बिस्माह मारूफ यांना एकाच षटकात बाद करत दोन धक्के दिले. यावेळी मुनीबा अलीला ३२ धावांवर स्नेहने झेलबाद केले तर बिस्माह मारूफला १७(19) धावांवर एलबीडब्ल्यू बाद केले. सामन्याच्या १२ व्या षटकांत भारताची गोलंदाज रेणुका सिंगने पाकिस्तानची फलंदाज आयशा नसीमला १० (9) धावांवर बाद केले. भारताची गोलंदाज शैफाली वर्माने पाकिस्तानची फलंदाज फातिमा सणाला ८(6) धावांवर बाद करत पाकिस्तानला सातवा धक्का दिला. उरलेल्या फलंदाजांना राधा यादवने बाद केले व पाकिस्तानला शंभर धावसंख्या ओलांडण्याच्या आधीच ऑल आऊट केले. पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी १०० धावांचे आव्हान ठेवले.

स्मृती मानधनाने दमदार ६३ धावांची खेळी

भारताच्या सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना आणि शैफाली वर्मा मैदानात उतरल्या. या दोन्ही फलंदाजांनी सुरूवातीपासूनच आक्रमक खेळी करण्यास सुरूवात केली. ही आक्रमक जोडी पाकिस्तानची गोलंदाज तुबा हसनने फोडली. तिने भारताची आक्रमक फलंदाज शैफाली वर्माला १६ (९) धावांवर बाद केले. तिच्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या सबभीनेंनी मेघना १४ (१६) धावाकरून बाद झाली. मेघानानंतर फलंदाजीसाठी जेमिमाह रॉड्रिग्जने स्मृतीला साथ दिली. स्मृती मानधनाच्‍या दमदार ६३ (४२) धावांमुळे भारताने पाकिस्‍तानवर सहज विजय मिळवला.

 

Back to top button