विंडीजविरुद्धच्या T20 मालिकेपूर्वी टीम इंडियाला झटका! स्टार ओपनर बाहेर | पुढारी

विंडीजविरुद्धच्या T20 मालिकेपूर्वी टीम इंडियाला झटका! स्टार ओपनर बाहेर

पुढारी ऑनलाईन डेस्क : WI vs IND T20I : गेल्या आठवड्यात केएल राहुल कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता, त्यामुळे त्याच्या भारतीय संघात पुनरागमनाला ग्रहण लागले होते. आता पुन्हा एकदा या सलामीवीराला धक्का बसला आहे. राहुल वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी टी 20 मालिकेचा भाग असणार नसल्याचे समोर आले आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धची टी-20 मालिका 29 जुलैपासून सुरू होत आहे. हि मालिका 7 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. गेल्या आठवड्यात, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मुंबईतील बोर्डाच्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीनंतर केएल राहुल हा कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले होते. राहुलने आता आयसोलेशनचा कालावधी पूर्ण केला आहे, परंतु ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, त्याला बीसीसीआयच्या डॉक्टरांनी आणखी एक आठवडा विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तो विंडीजविरुद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे.

भारतीय स्टार ओपनर केएल राहुलवर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. त्यानंतर त्याने बंगळुरूमधील एनसीएमध्ये पुन्हा सराव सुरू केला. खरं तर, राहुलला वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी 20 संघात स्थान देण्यात आलं होतं आणि त्याला काही दिवसांत फिटनेस टेस्ट द्यावी लागली होती. म्हणजेच आता राहुल झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान टीम इंडियाचा भाग होऊ शकतो, असे बोलले जात आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाचा टी-20 संघ मंगळवारी त्रिनिदादला पोहोचला. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणा-या भारतीय संघाने वनडे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेत आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. श्रेयस अय्यर, संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांच्या अर्धशतकांमुळे टीम इंडियाने रविवारी पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना दोन गडी राखून कला. आज (दि. 27) बुधवारी पोर्ट ऑफ स्पेन येथे तिसरा आणि शेवटचा वनडे सामना खेळला जाणार असून या सामन्यातही विजय मिळवून टीम इंडिया यजमान विंडीजला क्लिन स्विप देण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल.

Back to top button