ऋषभ पंत खेळू लागतो तेव्हा हृदयाचे ठोके वाढतात, हार्दिक पंड्याचा मोठा खुलासा | पुढारी

ऋषभ पंत खेळू लागतो तेव्हा हृदयाचे ठोके वाढतात, हार्दिक पंड्याचा मोठा खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्क : मँचेस्टर येथे रविवारी झालेल्या वनडे मालिकेतील निर्णायक सामन्यात भारताने इंग्लंडविरुद्ध पाच गडी राखून विजय मिळवला. या विजयानंतर अष्टपैलू हार्दिक पंड्याने शतकी खेळी साकारणा-या ऋषभ पंत बाबत मोठा खुलासा केला आहे. पंतची खेळी टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची होती. त्याचे धडाकेबाज शतक आणि हार्दिक पंड्याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने तिसरा सामना जिंकून मालिका 2-1 ने खिशात टाकली.

पंतने 113 चेंडूत नाबाद 125 धावांची शानदार आणि स्फोटक खेळी केली. त्याने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने इंग्लिश गोलंदाज सळो की पळो करून सोडले. तर त्याला अष्टपैलू हार्दिक पंड्याची तितकीच मोलाची साथ मिळाली. पंड्याने 55 चेंडूत 71 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत फलंदाजीवरील दबाव कमी केला. पंतसोबतच्या त्याच्या भागीदारीबद्दल पंड्याने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ‘माझ्या कामगिरीने मी सुखावलो आहे. सर्व विभागांमध्ये योगदान देणे नेहमीच खास असते. माझ्या खेळाने मला पूर्वी खूप आत्मविश्वास दिला आहे.’

तो पुढे म्हणाली की, ऋषभची खेळी आमच्यासाठी साहजिकच खूप महत्त्वाची होती. त्याने ज्या प्रकारे सामना फिनिश केला ती खूप मोठी गोष्ट होती. त्याच्याकडे कोणत्या प्रकारची प्रतिभा आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. तो मैदानावर आला की डोळ्यांना खूप सुखावतो. जेव्हा तो खेळू लागतो, तेव्हा ऋषभने खेळलेल्या शॉट्सच्या भीतीने प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढतात.

2019 च्या विश्वचषक स्पर्धेत भारत मँचेस्टरच्या याच मैदानावर सेमीफयनलमध्ये पराभूत झाला होता. यावर प्रतिक्रिया देत पंड्या म्हणाला की, ‘2019 च्या विश्वचषक स्पर्धेत या मैदानावर जे घडले तो भूतकाळ आहे. इंग्लंड सारख्या संघने मागिल काही वर्षांमध्ये शानदार खेळ केला आहे आणि त्यामुळे मला वाटते की, प्रत्येकजण इंग्लंड संघाला सर्वश्रेष्ठ संघांपैकी एक मानतात.’

 

Back to top button