कोहलीचे तंत्र चुकले : गावसकर

मुंबई : वृत्तसंस्था विराट कोहलीच्या अपयशाची चर्चा होत असताना भारताचे माजी कसोटीपटू सुनील गावसकर यांनी त्याच्या अपयशाचे कारण शोधले असून, इंग्लंडमध्ये त्याचे तंत्र चुकले असल्याचे म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या कसोटीत कोहलीने 11 आणि 20 अशा 31 धावा केल्या होत्या.
क्रीडा माध्यमाशी बोलताना गावसकर म्हणाले की, इंग्लंडमध्ये चेंंडू वेगात स्विंग होतो. यासाठी कोहलीने चेंडू लवकर खेळण्याची योजना बनवली होती; परंतु हीच योजना त्याच्या अंगलट आल्याचे दिसून येते. इंग्लंडमधील खेळपट्ट्यांवर यशस्वी व्हायचे असेल तर येथे चेंडू शक्य तितक्या उशिरा खेळला पाहिजे. चेंडू स्विंग होण्याची वाट पहावी, त्यानंतर त्याच्यावर फटका खेळावा; पण याउलट कोहली हा चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसत होता, यात तो फटका लवकर खेळून जात होता. याचा परिणाम त्याच्या अपशामध्ये झाला.
हेही वाचा