वाढदिवसानिमित्त धोनीचे 41 फूट उंच कटआऊट | पुढारी

वाढदिवसानिमित्त धोनीचे 41 फूट उंच कटआऊट

विजयवाडा : टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळख असलेला महेंद्र सिंग धोनी उद्या (गुरुवारी) आपला 41 वा वाढदिवस साजरा करणार आहे. धोनी सध्या आपल्या कुटुंबासमवेत लंडनमध्ये असून तेथेच तो आपला वाढदिवस साजरा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, धोनीच्या चाहत्यांनी या आवडत्या क्रिकेटरचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्याची तयारी केली आहे. यासाठी विजयवाडा शहरामध्ये भारताच्या या माजी कर्णधाराचा 41 फूट उंच असलेले कटआऊट उभारण्यात आला आहे. यामध्ये धोनी हेलिकॉप्टर शॉट मारताना दिसत आहे. एक चाहत्याने या कटआऊटचा फोटो पोस्ट केला असून त्याला हजारो लोकांनी लाईक केले आहे. यापूर्वी 2018 मध्येही केरळमध्ये 35 आणि चेन्‍नईत 30 फुटांचे धोनीचे कटआऊट उभारण्यात आले होते.

हेही वाचा

Back to top button