IND vs ENG : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ‘हा’ दिग्गज फलंदाज होऊ शकतो इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतून बाहेर | पुढारी

IND vs ENG : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ‘हा’ दिग्गज फलंदाज होऊ शकतो इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतून बाहेर

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा सलामीवीर केएल राहुल एजबॅस्टन येथे होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीतून बाहेर पडण्याचा धोका आहे. याआधी, पायाला झालेल्या दुखापतीमुळे राहुल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेतून बाहेर पडला होता आणि आता तो इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटीत खेळण्याबाबत शंका निर्माण झाली आहे. (IND vs ENG India vs England Test 2022)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी राहुलला भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले. मात्र दिल्लीतील पहिल्या सामन्यापूर्वी सराव करताना तो जखमी झाला. त्यानंतर ऋषभ पंतला संघाचा कर्णधार घोषित करण्यात आले. राहुलला इंग्लंड दौऱ्यासाठी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे, जिथे भारताला 1 ते 5 जुलै दरम्यान होणाऱ्या कसोटी सामन्याव्यतिरिक्त तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळायची आहे. (IND vs ENG India vs England Test 2022)

हा कसोटी सामना गेल्या वर्षी झालेल्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना आहे. चार कसोटी सामन्यांनंतर भारतीय संघातील सदस्यांना कोविडची लागण झाल्याचे प्रकरणे समोर आले होते. त्यामुळे शेवटची कसोटी पुढे ढकलण्यात आली. (IND vs ENG India vs England Test 2022)

क्रिकबझच्या बातमीनुसार, राहुल किती काळ मैदानाबाहेर असेल हे स्पष्ट झालेले नाही. काही दिवसांपूर्वीच तो बंगळूर नॅशनल क्रिकेट अकादमीत दुखापतींवर उपचार घेण्यासाठी दाखल झाला आहे. मात्र तो अद्याप फिट नसल्याचे समजते आहे. इंग्लंड विरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेत राहुलच्या खेळण्याबाबतही शंका आहेत. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यस वगळता कसोटी संघातील सर्व खेळाडू 16 जून रोजी इंग्लंडला रवाना होतील.

राहुल भारतीय संघातून बाहेर पडल्यास मयंक अग्रवालचा संघात समावेश होऊ शकतो. शुभमन गिल आधीच बॅकअप सलामीवीर म्हणून संघासोबत आहे.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ…

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा

Back to top button