पुढारी ऑनलाईन डेस्क : रणजी चषकामध्ये (Ranji Trophy 2022) यंदाच्या हंगामात चांगले सामने पाहण्यास मिळत आहेत. मुंबई (Mumbai cricket team) विरुद्ध उत्तराखंडच्या (Uttarakhand Cricket Team) सामन्यात मुंबईचा खेळाडू सुवेद पारकर (Suved Parkar) याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच इतिहास रचला आहे. तसेच मुंबईचे प्रशिक्षक अमोल मजूमदार (Amol Muzumdar) यांच्या रेकॉर्डची बरोबरी देखिल केली आहे. त्याने आपल्या प्रथम श्रेणीच्या पहिल्याच सामन्यात दुहेरी शतक ठोकत सर्वांनाच प्रभावित केले.
उत्तराखंड विरुद्धच्या (Ranji Trophy 2022) सामन्यात सुवेद पारकर याने २५२ धावांची खेळी केली यामध्ये त्याने २१ चौकार आणि ४ षटकारांची आतषबाजी केली. शेवटपर्यंत उत्तराखंडचे गोलंदाज त्याला बाद करु शकले नाहीत अखेर तो रनआऊट झाला. या आधी मुबईचे प्रशिक्षक अमोल मजूमदार यांनी १९९४ साली हरियाणाच्या विरुद्ध पदार्पणातच २६० धावांची खेळी केली होती. पदार्पणात दुहेरी शतक ठोकणारा सुवेद पारकर हा मुंबईचा दुसरा खेळाडू ठरला तर भारतातील तो १२ खेळाडू बनला आहे.
या सामन्या विषयी बोलायचे झाले तर मुंबईने (Ranji Trophy 2022) आठ बाद ६४७ धावांवर डाव घोषित केला. मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉ याने २१ धावांची खेळी केली. तसेच सर्फराज खान याने शतकी खेळी केली त्याने २०५ चेंडूत १५३ धावा केल्या. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत मुंबईच्या धावांचा पाठलाग करण्यास मैदानात उतरलेल्या उत्तराखंडच्या संघाने ११ षटकात २ फलंदाजांच्या मोबदल्यात ३९ धावा बनवल्या.
उपांत्यपूर्व सामन्यात (Ranji Trophy 2022) उत्तराखंडच्या विरुद्ध पदार्पणात दुहेरी शतक बनवणाऱ्या सुवेद भारताचा १२ खेळाडू ठरला. तर या हंगामात पदापर्णातच २०० हून अधिक धावा करणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी सकीबुल गनी ३४१ आणि महाराष्ट्राचा पवन शाह याने २१९ धावांची खेळी केली आहे.
प्रथम श्रेणीत पदापर्णात सर्वोच्च धावां करणारे खेळाडू :