बापरे! शिखर धवनला रबाडाकडून मारहाण!, जाणून घ्या नेमकं काय घडलं.. (Video) | पुढारी

बापरे! शिखर धवनला रबाडाकडून मारहाण!, जाणून घ्या नेमकं काय घडलं.. (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या आयपीएलमध्ये (IPL 2022) पंजाबचा फलंदाज शिखर धवन आणि वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा यांची कामगिरी चांगलीच सुरू आहे. हे दोन्ही खेळाडू सातत्याने दमदार खेळाचे प्रदर्शन करत आहेत. एकीकडे शिखर धवन आपल्या बॅटमधून धावा जमवत असून, त्याच्या जोरावर तो संघाला विजय मिळवून देत आहे. तर दुसरीकडे कागिसो रबाडा आपल्या वेगवान गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना धडकी भारवत आहे. पण सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो शिखर धवन आणि रबाडाशी संबंधित आहे. या व्हिडिओची चर्चा जोरदार सुरू असून तो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (shikhar dhawan kagiso rabada instagram reel ipl 2022)

रबाडा शिखर धवनला का मारहाण करतोय?

शिखर धवन उर्फ गब्बर त्याच्या फलंदाजीसोबतच इंस्टाग्राम रील्ससाठी प्रसिद्ध आहे, जिथे हा खेळाडू कॅमेऱ्यासमोर अभिनय करताना हिरोपेक्षा कमी दिसत नाही. गब्बरचे इन्स्टा रील अप्रतिम असतात. ते पाहून चाहत्यांचे मनोरंजन होते. सध्या त्याने पंजाब किंग्ज संघाच्या खेळाडूंसोबत रील बनवून पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर धुमाकुळ घातला आहे. शिखरच्या या रील्समध्ये अनेकवेळा रबाडाही दिसला आहे. नवीन रीलमध्येही रबाडा गब्बरसोबत मजामस्ती करताना दिसत आहे. (shikhar dhawan kagiso rabada instagram reel ipl 2022)

शिखर धवनने त्याच्या इंस्टाग्रामवर नवे रील शेअर केले आहे. या छोट्या व्हिडिओत रबाडा धवनला मारहाण करताना दिसत आहे. हा इन्स्टा रील ‘ओम फो धर्राटे काट रही है’ या मीमवर बनवण्यात आला आहे. दोन्ही खेळाडूंची हे रील व्हायरल होत आहे. (shikhar dhawan kagiso rabada instagram reel ipl 2022)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

गब्बरने याआधीही रबाडासोबत इन्स्टा रील बनवले

 

View this post on Instagram

 

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

पंजाबचा संघ पॉइंट टेबलमध्ये कुठे आहे?

पंजाबचा संघ सध्या गुणतालिकेत 7 व्या क्रमांकावर आहे, तसेच उर्वरित सामने जिंकणे संघासाठी खूप महत्त्वाचे आहे. या संघाने आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत, त्यापैकी मयंकच्या संघाने 5 जिंकले आहेत आणि 5 गमावले आहेत.

Back to top button