RCB vs CSK : अटीतटीच्या लढतीची अपेक्षा

RCB vs CSK : अटीतटीच्या लढतीची अपेक्षा www.pudharinews.
RCB vs CSK : अटीतटीच्या लढतीची अपेक्षा www.pudharinews.
Published on: 
Updated on: 

पुणे ः वृत्तसंस्था कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली कात टाकत असलेला चेन्नई सुपर किंग्जचा संघ बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध दोन हात करण्यासाठी सज्ज झाला असून हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गुणतालिकेचा विचार केला तर तीन विजय मिळवून चेन्नईचा संघ नवव्या क्रमांकावर आहे. त्यांनी नऊ सामन्यांतून सहा पराभव आणि तीन विजय अशी कामगिरी बजावली आहे. (RCB vs CSK)

तथापि, 1 मे रोजी झालेल्या सामन्यात चेन्नईचा संघ मूळ रूपात दिसून आला. त्या लढतीत त्यांनी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 202 धावांचा डोंगर उभारला आणि सामना जिंकलासुद्धा. रवींद्र जडेजाकडून पुन्हा धोनीने कर्णधारपद स्वतःकडे घेतल्यानंतर चेन्नईच्या खेळाचा दर्जा उंचावत चालला आहे. त्यामुळे अजूनही त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची आशा बाळगता येते. जर त्यांनी यापुढचे सगळे सामने मोठ्या फरकाने जिंकले तर ही बाब शक्य आहे. (RCB vs CSK)

सलामीवीर ऋतुराज गायकवाड याला सापडलेला सूर ही चेन्नईची जमेची बाजू म्हटली पाहिजे. हैदराबादविरुद्ध त्याचे शतक केवळ एका धावेने हुकले. शिवाय वयाच्या चाळीशीतही धोनी आपली बॅट एखाद्या दांडपट्ट्यासारखी चालवतोय. चेन्नईला गोलंदाजीत मात्र विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे. मुकेश चौधरी त्या दृष्टीने झकास कामगिरी बजावू शकतो. खेरीज त्याला माहीश तीक्शाना चांगली साथ देऊ शकतो. त्याची जादू चालली तर चेन्नईचे काम अधिक सोपे होऊ शकेल. (RCB vs CSK)

बेंगलोर संघाचा विचार केला तर फाफ डू प्लेसिसला कर्णधार या नात्याने स्वतः उत्तम फलंदाजी करावी लागणार आहे. विराट कोहलीला सूर सापडला ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली आहे. ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद. अनुज रावत यांनाही तगडी फलंदाजी करावी लागेल. यापैकी कोणाच्याही फलंदाजीत सातत्य दिसलेले नाही. त्यामुळेच दहा सामन्यांपैकी पाच सामन्यांत बेंगलोरला हार स्वीकारावी लागली आहे. पाच विजय संपादून त्यांच्या खात्यात दहा गुण जमा झाले आहेत. (RCB vs CSK)

गोलंदाजीचा विचार केला तर जोश हेझलवूड, महम्मद सिराज, हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा असे सरस गोलंदाज बेंगलोरच्या ताफ्यात आहेत. अनेक तारांकित खेळाडूंचा भरणा या चमूमध्ये दिसून येते. प्रश्न आहे तो प्रत्यक्ष मैदानावर त्यांची कामगिरी बहरण्याचा. आत्मविश्वास उंचावलेल्या चेन्नईला हा संघ कशी लढत देणार हे आपल्याला लवकरच दिसेल. त्यासाठी थोडी वाट पाहायला हवी. (RCB vs CSK)

आकडे बोलतात…

चेन्नई आणि बेंगलोर यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत 29 सामने झाले आहेत. त्यात चेन्नईचे पारडे जड असल्याचे दिसून येेते. चेन्नईने 19 सामने जिंकले असून 9 लढतींत त्यांना हार पत्करावी लागली आहे. एक सामना अनिर्णीत अवस्थेत संपला आहे. बेंगलोरने 9 विजय मिळवून 19 सामने गमावले आहेत. चेन्नईची सर्वोच्च धावसंख्या 205 अशी असून नीचांकी धावसंख्या आहे 70. बेंगलोरची सर्वोच्च धावसंख्या 216 असून नीचांकी धावसंख्या आहे 82. (RCB vs CSK)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – (RCB vs CSK)

विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, जोश हेझलवूड, शाहबाज अहमद, अनुज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, शेरफेन रदरफोर्ड, जेसन बेहरेनडॉर्फ, सुयश प्रभूदेसाई, चमा मिलिंद, अनिश्वर गौतम, कर्ण शर्मा, सिद्धार्थ कौल, लवनीथ सिसोदिया, डेव्हिड विली.

चेन्नई सुपर किंग्ज – (RCB vs CSK)

रवींद्र जडेजा (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, दीपक चहर, केएम आसिफ, तुषार देशपांडे, ड्वेन ब्राव्हो, डेवॉन कॉन्वे, शुभ्रांशू सेनापती, तुषार देशपांडे, शिवम दुबे, महीष तीक्ष्णा, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिशेल सँटनर, प्रशांत सोलंकी, सी हरी निशांत, ख्रिस जॉर्डन, के भगत वर्मा, मुकेश चौधरी, सिमरनजीत सिंग.

हेही वाचलतं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news