वडूज; पुढारी वृत्तसेवा : खटाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली असून वडूज पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.
गजानन अनंता खैरे (रा. कल्याण, ता. मेहकर, जि. बुलढाणा), असे संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बीड जिल्ह्यातून एक कुटुंब पडळ व गोपूज या कारखाण्याची ऊसतोड करण्यासाठी आले होते. ते खटाव तालुक्यातील एका गावातील शिवारात कोपी टाकून राहत होते. त्यांच्या कोपिशेजारीच संशयित हा देखील राहत होता. सोमवार दि.2 मे रोजी कारखाना बंद झाल्याने पीडित कुटुंब गावाकडे जाण्यासाठी आवरा आवर करत होते.दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास मुलीचे वडील कामानिमित्त गावात गेल. याचा गौरफायदा घेत संशयिताने पीडित मुलीस मोबाईल दाखवतो असे म्हणून बाहेर नेले. मुलीचे वडील गावातून परत आल्यानंतर मुलगी कुठे दिसत नसल्याने त्यांनी तिचा शोध घेतला. त्यावेळी जवळच असलेल्या आंब्याच्या झाडाखाली मुलगी जखमी अवस्थेत आढळून आली. वडिलांनी मुलीला याबाबत विचारले असता तिने गजानन खैरे याने अत्याचार केले असल्याचे सांगितले. या घटनेची माहिती मिळताच सपोनि मालोजीराव देशमुख, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण दीक्षित यांनी घटनास्थळी भेट देऊन संशयिताला अटक केली.