Quinton de Kock : क्विंटन डी कॉकच्या खिलाडूवृत्तीनं जिंकली प्रेक्षकांची मने, पहा नेमकं काय घडलं? (video) | पुढारी

Quinton de Kock : क्विंटन डी कॉकच्या खिलाडूवृत्तीनं जिंकली प्रेक्षकांची मने, पहा नेमकं काय घडलं? (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : लखनौ सुपर जायंट्सने आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्जवर २० धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत असताना लखनौने २० षटकांअखेर १५३ धावा केल्या. लखनौने पंजाब किंग्जसमोर १५४ धावांचे आव्हान दिले होते.  यानंतर फलंदाजीसाठी आलेला पंजाब किंग्जचा संघ १३३ धावा करू शकला. (Quinton de Kock)

लखनौ वि. पंजाब झालेल्या या सामन्यादरम्यान केलेल्या कृतीमुळे क्विंटन डी कॉकवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. क्विंटन डी कॉकने या सामन्यादरम्यान खिलाडू वृत्ती दाखवली. पंजाब किंग्ज विरोधात लखनौची सुरूवात खराब झाली होती. लखनौचा कर्णधार के. एल. राहुल स्वस्तात माघारी परतला होता. यानंतर डी कॉक आणि दीपक हुड्डाने दुसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची भागिदारी रचली.

स्वतःहून मैदानाबाहेर गेला डी कॉक…

या भागिदारीत डी कॉकने ४६ धावांचे योगदान दिले. पण डी कॉकने केलेल्या धावांपेक्षा तो बाद होण्यावरून चर्चा रंगली आहे. संदीप शर्मा टाकत असलेल्या १३ षटकात डी कॉक झेलबाद झाला. मात्र पंचांनी काही निर्णय न देऊनही डी कॉक खेळाडूवृत्ती दाखवत मैदानातून बाहेर पडला. या त्याच्या कृतीनंतर चाहत्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Quinton de Kock)

हेही वाचलतं का?

Back to top button